No-confidence motion in lok sabha : 'इंडिया' आघाडीच्या वतीने मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात आणल्या गेलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारीही लोकसभेमध्ये चर्चा रंगणार आहे. मंगळवारी सहा तासाच्या चर्चेनंतर बुधवारी दुपारी बारा वाजल्यानंतर पुन्हा अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होणार आहे. आसाममधील युवा काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चा करत, मणिपूर मुद्द्यासह इतर मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना धारेवर धरत, अमित शाह यांना जिव्हरी लागणारे भाषण केले. या गोगाईच्या भाषणाला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाची मातब्बर मंडळी कशी तोंड देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मणिपूर हिंसाचारावरून मंगळवारी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.
आसाममधील युवा खासदार असलेले गौरव गोगई हे काँग्रेसचे उपनेते आहेत. दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगई यांचे ते पुत्र असून काँग्रेसचा युवा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमधून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.त्यानंतर त्यांनी बी.टेक केले आहे. २००४ साली इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंगच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानी काही काळ एयरटेलच्या मार्केटिंग टीममध्ये काम केले आहे.त्यानंतर 'युएसए'मध्ये लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यासासाठी गेले.
न्यूयॉर्क विश्वविद्यायामध्ये लोकप्रशासनची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. गोगोई हे २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरले. २०१४ साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून कलियाबोर लोकसभा मतदारसंघातून ९३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.धारेवर धरलं होत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचा शाब्दीक वाद झाला.
गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात करत मंगळवारी केंद्र सरकारवर मणिपूर मुद्द्यासह इतर मुद्द्यावरून देखील जोरदार निशाणा साधला. गोगोईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वांखालील भाजप सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचे नेतृत्व केले आहे.
मोदींनी आतापर्यंत मणिपुरचा दौरा का केला नाही ?
मणिपुर मुद्द्यावर बोलण्यास ८० दिवस का लागले ?
जेव्हा पंतप्रधान बोलले त्यावेळी केवळ ३० सेकंद का बोलले ?
आतापर्यंत मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांना निलंबित का केले नाही?
गोगोई म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मुद्यावर गप्प बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आम्हाला 'इंडिया'या आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेत मणिपूरच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलावे असे वाटते.
विरोधी पक्षाच्या इतर खासदारांनी देखील मणिपूरच्या मुद्द्यासह त्या त्या राज्यातील मुद्यावरून सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी हे मंगळवारी लोकसभेमध्ये उपस्थित होते पण अविश्वास प्रस्तावावर ते बोलले नाहीत, त्यामुळे राहुल गांधी बुधवारी बोलतात का ? की पंतप्रधान सभागृहात आल्यानंतरच बोलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यानंतर पंतप्रधान अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत.