Sarkarnama
देश

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्यावर भडकलेल्या 'लेडी सिंघम' चर्चेत; कोण आहे ही धडाकेबाज अधिकारी

Prashant Kishor latest controversy : प्रशांत किशोर प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोण आहेत या अधिकारी? जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीची आणि चर्चेची संपूर्ण माहिती.

Rashmi Mane

जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि पटना सेंट्रल सिटीच्या एसपी ममता कल्याणी यांच्यात झालेल्या तीव्र शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना राजधानी पटना येथे मोठा राजकीय व प्रशासकीय वाद पाहायला मिळाला. या घटनेनंतर कडक भूमिका घेणाऱ्या ममता कल्याणी यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून अनेकजण त्यांना 'लेडी सिंघम' असं म्हणत आहेत.

ही संपूर्ण घटना बांकीपूर पोटनिवडणुकीदरम्यान घडली. मतदान सुरू असताना जन सुराजने आरोप केला की, त्यांच्या अनेक मतदान प्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मतदानापूर्वी ताब्यात घेतले. या आरोपांनंतर प्रशांत किशोर आपल्या समर्थकांसह पोलिस अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागण्यासाठी पोहोचले. यावेळी वातावरण चांगलेच तापले आणि प्रशांत किशोर व एसपी ममता कल्याणी यांच्यात जोरदार वाद झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ममता कल्याणी यांनी वारंवार आचारसंहितेचा उल्लेख करत प्रशांत किशोर आणि त्यांच्या समर्थकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लोक एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र जमू शकत नाही." त्यांनी सर्वांना टेथून तात्काळ सोडण्याचे निर्देशही दिले.

कोण आहेत ममता कल्याणी?

ममता कल्याणी या बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) 45 व्या बॅचच्या पोलीस अधिकारी आहेत. शिस्तप्रिय, कठोर आणि प्रभावी प्रशासकीय कामकाजामुळे त्यांनी बिहार पोलिस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच झालेल्या प्रशासकीय बदलानंतर त्यांच्याकडे पटना सेंट्रल सिटी एसपी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी त्यांनी डीएसपी म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. राजधानीतील संवेदनशील भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरची ही त्यांची पहिली मोठी निवडणूक मानली जात आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर आणि ममता कल्याणी यांच्यातील या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, एका बाजूला जन सुराज पोलिसांवर पक्षपाती कारवाईचे आरोप करत आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस प्रशासन संपूर्ण कारवाई कायदेशीर चौकटीत आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार झाल्याचा दावा करत आहे. त्यामुळे ही घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT