

Pune News: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे आता दरवर्षी 1 ऑगस्ट हा अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 29 जुलै 2026 रोजी अध्यादेश काढला आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्यिक वारशाचे स्मरण व्हावे, नव्या पिढीला लेखनाची प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 1 ऑगस्ट रोजी 'लेखन प्रेरणा दिन' विविध साहित्यिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास, लेखनाची प्रेरणा आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
'लेखन प्रेरणा दिना'निमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कविता, कथा आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती, व्याख्याने आणि ग्रंथदिंडीसारखे उपक्रमही राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, लोकनाट्य आणि शाहिरी साहित्याचे वाचन करावे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि साहित्यिक योगदानावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा तसेच साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.
उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कला संचालनालयांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांना 1 ऑगस्ट रोजी 'लेखन प्रेरणा दिन' साजरा करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, असेही शासनाने परिपत्रकात नमूद केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्यिक वारशाचे स्मरण व्हावे, नव्या पिढीला लेखनाची प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.