Delhi, 29 Jan 2025: दिल्लीत 27 वर्षांपासून सत्तेसाठी वंचित राहिलेल्या भारतीय जनता पक्षाला आता सत्ता स्थापनेचे वेध लागले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली तर मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय हायकंमाड घेणार आहे, पण उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा स्थानिक राजकारण आणि सामाजिकतेवर आधारित असावा, असा विचार भाजप पक्षश्रेष्ठी करीत आहेत. दिल्ली हे देशातील राजकारणातील संवेदनशील राज्य आहे. हे पद फक्त प्रशासकीय नसून राजकीय संदेश देण्यासाठी भाजपसाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे भाजप दिल्लीत उपमुख्यमंत्रिपदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे लवकरत समजेल. त्यासाठी काही नावे चर्चेत आहेत, ती कुठली हे जाणून घेऊयात.
दिल्ली भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी काही प्रमुख दावेदार आहेत. यात पक्षाचे वरिष्ठ नेता, आणि पदाधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा आहे. यात मनोज तिवारी यांचे नाव आघाडीवर आहे. ते पूर्व दिल्लीचे भाजप अध्यक्ष होते. पूर्वांचल मतदारांच्या जवळचे आहेत.
दुसरे नाव आहे ते विजेंद्र गुप्ता याचे. गुप्ता हे दिल्ली भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. जनतेशी असलेली त्यांची नाळ, संघटनकौशल्य यामुळे गुप्ता या पदासाठी प्रमुख दावेदार समजले जातात. या नावाखेरीज रामवीर सिंह बिधूडू यांच्या नावाचीही चर्चा आहे. ते जाट समाजाचे आहे. ग्रामीण परिसरात भाजपची ताकद वाढवण्याची ताकद त्यांच्यात आहे.
दिल्ली सारख्या बहुसांस्कृतिक राज्यात सामाजिक आणि राजकीय समिकरण जुळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पूर्वाचल, जाट आणि गुर्जर, सिख समाजामध्ये पक्ष वाढवणे, हे भाजपसमोरील आवाहन आहे. भाजप पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्रीपदासाठी स्थानिक नेत्याला संधी देणार की नवीन चेहरा समोर आणणार हे यांची उत्सुकता दिल्लीकरांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.