Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
देश

RSS On BJP : "आधी श्री रामाची भक्ती, नंतर अहंकार आला म्हणून..."; RSS च्या सदस्यानं भाजपला फटकारलं

Akshay Sabale

BJP Political News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी सत्ताधारी भाजपला 'अहंकारी' आणि 'इंडिया' आघाडीला श्री राम विरोधी म्हटलं आहे.

ज्यांनी प्रभू श्री रामाची भक्ती केली, त्यांच्यात हळू-हळू अहंकार आला. त्यामुळे प्रभू श्री रामानं त्यांना रोखलं, असं म्हणत इंद्रेश कुमार यांनी भाजपला फटकारलं आहे.

जयपूरजवळील कानोता येथील 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारोहणा'च्या कार्यक्रमात इंद्रेश कुमार (Indresh Kumar) बोलत होते. इंद्रेश कुमार 'आरएसएस'चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आहेत. कुमार यांनी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही. पण, एकप्रकारे कुमार यांनी भाजप आणि विरोधी पक्षाला लक्ष्य केलं आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले, "ज्या पक्षानं ( भगवान श्री रामाची ) भक्ती केली, नंतर हळू-हळू अहंकारी बनले. त्यामुळे 241 जागांवर रोखण्यात आलं. पण, त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवलं. ज्यांना श्री रामाबद्दल आस्था नाही, त्यांना ( इंडिया आघाडी ) 234 वरच थांबवलं."

"ज्यांनी श्री रामाची भक्ती केली, नंतर ते अहंकारी बनले. ते सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आले. पण, त्यांना जी मते आणि ताकद मिळणे अपेक्षित होते, ते भगवान श्री रामाने अहंकाराच्या दिली नाहीत. म्हणून मी म्हणतो देवाचा न्याय विचित्र नाही, तर तो खरा आणि आनंददायक आहे," असं म्हणत इंद्रेश कुमार यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

"अयोध्येतील भाजपचे (BJP) उमेदवार लल्लू सिंह यांनी जनतेवर अत्याचार केले. तेव्हा श्री रामानं त्यांना निवडणुकीत 5 वर्षांची विश्रांती दिली. श्री रामानं त्यांना सांगितलं 5 वर्ष आराम करा, पुन्हा पाहू," असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT