Jairam Ramesh
Jairam Ramesh Sarkarnama
देश

Karnataka Assembly Elections : अमित शाहांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला ; जयराम रमेश म्हणाले, "‘असत्यमेव जयते..’

सरकारनामा ब्यूरो

Congress strongly criticizes modi shah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषिक वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिणेकडील राज्यांत हिंदी लादण्याचा प्रयत्न भाजपा आणि केंद्र सरकार करत असल्याचा आरोप फेटाळून लावला.

नरेंद्र मोदी सरकारने राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये, सर्व भाषांमध्ये विविध भरती परीक्षा घेण्याची व्यवस्था केली होती. भारतीय भाषांच्या संवर्धनाचा वसा भाजपाने घेतला असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

यावर काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh)यांनी टि्वट करीत अमित शाह यांचा हा दावा खोडून काढला आहे. जयराम रमेश यांनी भाजपावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

मोदी सरकारने संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले, तर कन्नडसाठी केवळ 3 कोटी रुपये खर्च केले, अशी आकडेवारीच काँग्रेसने (Congress) सादर केली. ‘असत्यमेव जयते’ हे ज्यांचे आदर्श वाक्य आहे, अशा व्यक्तीसमवेत तुम्ही काम करत आहात, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. "मी अजून खूप गोष्टी सांगू शकतो. पण तुम्ही अशा व्यक्तीबरोबर काम करता, जिचे आदर्श वाक्य ‘असत्यमेव जयते’ आहे," अशी टीकाही जयराम रमेश यांनी केली.

"भारतीय भाषांच्या संवर्धनाचा वसा भाजपाने घेतला आहे म्हणूनच महान कुवेम्पूचा (ज्याने राज्यगीत लिहिले) अपमान करणाऱ्या व्यक्तिला कर्नाटकातील पाठ्यपुस्तक पुनर्निरीक्षण समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते का?" असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सत्ताधारी भाजपा पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या वर्षीही कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी लढत होत आहे. ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींनी कर्नाटकमध्ये त्रिंशकू परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठ विधान केले आहे. टीएमसीच्या जनसंपर्क अभियानात ममता बॅनर्जी बोलत होत्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान आहे, तर १३ मे रोजी निकाल आहे. "दहा मे नंतर भाजपचे अस्तित्व संपण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे मला आनंद होईल," असे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT