Maharashtra Politics : Vijay Wadettiwar :Shara Sarkarnama
देश

Vijay Wadettiwar News : शरद पवारांना भाजपसोबत आणण्याच्या मोदींच्या अटीचा दावा वडेट्टीवारांनी का केला ?

Chetan Zadpe

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेल्या गुप्त भेटीने राजकारण चांगेलच ढवळून निघाले. आता त्यांच्या याच भेटीवरून राजकारणात नव्या चर्चांना ऊत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना यांना, आगामी काळात जर शरद पवारांना भाजप सोबत घेऊन आले, तरच मुख्यमंत्रीपद देणार असल्याची अट घातली असल्याचा दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)

विरोधीपक्षांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्वच पक्षाच्या प्रमुख नेते-मंडळीकडून यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे महविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गटानेही सावध भूमिका घेतली आहे.

मोदी-अजितदादांबाबत वडे्टटीवारांनी विधान का केले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेचे समीकरण जुळवून घेत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र दुसरीकडे आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत तडजोड करणार नसल्याचे शरद पवारांनी वारंवार सांगितले.

बंडानंतर अजित पवारांच्या भेटी -

राष्ट्रवादी काँग्रेस बंड करून अजित पवार भाजपसोबत गेले असले तरी त्यांनी या बंडानंतरही अनेकदा अजित पवार आणि शरद पवार यांची अनेकदा भेट झाली. कधी उघड भेट घेतली गेली तर कधी गुप्तपणे भेटीही झाल्या. यामुळे अजित पवार शरद पवारांना आपल्यासोबत चला, आम्हाला आशिर्वाद द्या, असे साकडे अजित पवार शरद पवारांना घालत आहेत, अशी चर्चा आहे.

शरद पवारांना सोबत घेण्याची भूमिका -

राष्ट्रवादीतील बहुतांश आमदार यांनी अजित पवारांसोबत आणि सत्तेसोबत जाणे पसंत केले असले तरी सर्व आमदार शरद पवारांनाच आपले नेते मानतात. यामुळे शरद पवारांची सोबत असावी, असे बहुतांश आमदारांची भूमिका आहे. यामुळे आगामी काळात भाजपसोबत राष्ट्रवादी राहावी, आमदार राहावेत, म्हणून शरद पवारांचा आशिर्वाद मिळावा, असे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते.

राज्यातील एका माजी मुख्यमंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "भाजपला माहित आहे, शरद पवारांशिवाय लोकसभेच्या ३५ जागा जिंकता येणार नाहीत. त्यामुळेच भाजपने त्यांना सोबत घेण्याची अट घातली असावी. " या सर्व घटनांचा अंदाज लावत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सोबत घ्यावे, अशी अट अजितदादांना घातली असावी, असा वडेट्टीवारांनी दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT