Praniti Shinde On NCP: मावळ आपलं असणार; 'समझनेवाले को इशारा काफी है' सांगत प्रणिती शिंदेंचं राष्ट्रवादीला थेट आव्हान

Maval Lok Sabha Constituency: महाराष्ट्रात स्थिर सरकार काँग्रेस देऊ शकते, प्रणिती शिंदेना भलताच कॉन्फिडन्स
Praniti Shinde On NCP
Praniti Shinde On NCPSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आढावा बैठक घेतली. जोपर्यंत मावळ आपला होत नाही, तोपर्यंत इथे येतच राहणार, असे सांगत कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांनी चार्ज केले. मावळ आपला असणार आहे, 'समझनेवाले को इशारा काफी है', असे सांगत त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच मावळात आव्हानच देऊन टाकले.

६ ऑगस्टला काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक नेमले आहेत. ते आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहेत. त्यानुसार पुणे आणि मावळची जबाबदारी देण्यात आलेल्या शिंदेनी काल मावळचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक सर्व्हेचे कल हे आपल्या बाजूने असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला.

Praniti Shinde On NCP
Praniti Shinde On Maval: राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; प्रणिती शिंदेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

मावळमध्ये पक्षाचा खासदार नाही ही उणीव नाही, तर संधी आहे. कारण जिथे खासदार नसतो तेथे कार्यकर्ते जास्त असतात, असे त्या म्हणाल्या. मावळात पक्ष जिवंत ठेवल्याबद्दल त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले. कार्यकर्त्यांमुळे नेते असतात, असे सांगत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढवला.

काँग्रेसमध्ये जी लोकशाही आहे, ती कुठल्या इतर पक्षात नाही, असे सांगत शिंदेंनी प्रतिस्पर्धी भाजपसह मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही यावेळी लक्ष्य केलं. मतदारांचा कल हा काँग्रेसकडे आहे, असे सांगत महाराष्ट्रात काँग्रेस स्थिर सरकार देऊ शकते, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Praniti Shinde On NCP
Praniti Shinde On Loksabha Candidature: सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या...

आम्हाला काँग्रेसलाच मत द्यायचं आहे, फक्त तुम्ही चांगला उमेदवार द्या, असं लोक येऊन सांगत आहेत, असं त्या म्हणाल्या. त्यासाठी आपल्याला महागाई, बेरोजगारी, मणिपूर आणि 'भारत जोडो यात्रा' हे मुद्दे घेऊन `घर टू घर`गेले पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी दिला.

`एनसीपी`चा मतदार हा पूर्वी काँग्रेसचा होता. पण, पर्यायाअभावी तो त्यांच्याकडे गेला. मात्र, एनसीपीतील फुटीमुळे तो पुन्हा आपल्याकडे खेचता येईल, असे शिंदेंनी यावेळी सूचित केले. निवडणूक सर्व्हेचे कल आपल्या बाजूने असणे या संधीचे सोने करा, भले ती तारेवरची कसरत असेल, कारण भाजप निवडणुकीसाठी कायपण करते, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com