Rahul Gandhi News : राहुल गांधी खरंच 'गांधी' आहेत का ? शरद पोक्षेंच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले...

Sharad Ponkshe News : ते काही महात्मा गांधीचे वंशज नाही त्यांच्या आडनावाचा फायदा त्यांनी घेतला.
Sharad Ponkshe slams Rahul Gandhi
Sharad Ponkshe slams Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nashik : 'नेहरू आडनाव लावायला लाज वाटते का?'असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यापूर्वी संसदेत राहुल गांधींना विचारला होता. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर आगपाखड केली होती. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर गंभीर टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ते खरंच गांधी आहे का ? असा सवाल केला आहे. त्यांचे मुळ नाव खान आहे, असे ते म्हणाले.

ते काही ओरिजनल गांधी नाही तर खान आहेत, ते काही महात्मा गांधीचे वंशज नाही त्यांच्या आडनावाचा फायदा त्यांनी घेतला. ते फिरोज खान यांचे वंशज आहेत. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांना आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा इतिहास कसा माहीत असणार," असा सवाल शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात उपस्थित केला.

Sharad Ponkshe slams Rahul Gandhi
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या समर्थनार्थ अमरावतीत लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.. ; ...मोहब्बत की जीत

स्वातंत्र्य दिनानिमित्त मालेगावमध्ये भारतीय विचार मंचातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर टीका केली. पोक्षे यांच्या या विधानावरून काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Sharad Ponkshe slams Rahul Gandhi
Mamata Banerjee on Narendra Modi : "पंतप्रधान म्हणून मोदींचे लाल किल्ल्यावरुन शेवटचे भाषण असेल" ; ममता बॅनर्जी यांची टीका

काही महिन्यापूर्वी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की कोणत्याही कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर ते (काँग्रेस) चिडतात. ते इतके महान व्यक्ती होते तर मग त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास भीती वाटते का? नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते का?"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com