Karnatak Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान (Karnatak Elelction) जर एखादी जागा सतत चर्चेत राहिली असेल तर ती म्हणजे कोलारची जागा. त्याचं कारणही तसचं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर या जागेवरून ते कर्नाटक निवडणुकीत उतरणार आहेत. (Why is Kolar assembly constituency so important? Find out why)
हे तेच ठिकाण आहे जिथे 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'क्या हर मोदी सरनेम वाले चोर होते है' असे विधान केले होते. त्यानंतर गुजरातचे भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मार्च 2023 मध्ये सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
त्यानंतर त्यांना 30 दिवसांचा जामीन मिळाला, पण दोन वर्षांच्या शिक्षेमुळे ते संसद सदस्य म्हणून अपात्र ठरले. तर दुसरे कारण म्हणजे वरुणा जागेव्यतिरिक्त कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोलारमधून निवडणूक लढवण्याकडे आस लावून बसले आहेत. सिद्धरामय्या यांना या जागेवरून निवडणूक लढवायची आहे
सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज आहेत, त्यांनी 2013 ते 2018 दरम्यान मुख्यमंत्री आणि 1996 आणि 2004 मध्ये दोनदा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांचा राजकीय प्रवास चामुंडेश्वरीपासून सुरू झाला. त्यांनी 1983 ते 2006 दरम्यान सात विधानसभा निवडणुका आणि चामुंडेश्वरी येथून पोटनिवडणूक लढवली परंतु त्यांनी कधीही कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही परंतु त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ही शेवटची निवडणूकही कोलारमधून लढवायची आहे.
कोलार हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे का?
कोलार ही एक शहरी जागा आहे, तिची शहरी लोकसंख्या 40 टक्क्यांहून अधिक आहे.कर्नाटकच्या स्थापनेपासून कोलार जागेसाठी 14 विधानसभा निवडणुका झाल्या असून त्यामध्ये काँग्रेसला केवळ पाच वेळा विजय मिळाला आहे.
1983 पासून फक्त दोनदा जिंकला आहे
गेल्या चार दशकांत कोलार ही जागा एकंदरीत बिगर काँग्रेसची जागा आहे. 1983 पासून काँग्रेसने ही जागा फक्त दोनदा जिंकली आहे, एकदा 1989 मध्ये आणि पुन्हा 2004 मध्ये.
2018 मध्ये जेडीएसला विजय मिळाला
2018 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे के श्रीनिवास गौडा यांनी 24 टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसचा पराभव करून ही जागा जिंकली. 2004 मध्ये काँग्रेसचे उमेदवार तेच श्रीनिवास गौडा होते ज्यांनी 2018 मध्ये जेडीएसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.
कोलार मतदारसंघातील मतदारांचा बदलता मुड
कोलार सीटवर जनतेचा मूड बदलल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.1983 मध्ये जनता पक्षाने काँग्रेसकडून हिसकावून घेतला आणि 1985 च्या विधानसभा निवडणुकीत तो कायम ठेवला. मात्र, 1989 मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. जनता दलाने 1994 मध्ये पुन्हा एकदा जागा जिंकली आणि ती 1999 पर्यंत राखली.
Edited By -Anuradh Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.