Nitu Singh Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Flying Kiss Controversy : राहुल गांधी 50 वर्षाच्या महिलेला 'फ्लाईंग किस' का देतील ? त्यांच्या मागे मुली कमी आहेत का? काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने वादात भर..

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणानंतर केलेली फ्लाईंग किसच्या कृतीवर जोरदार घमासान दिसून आले. राहुल यांच्या या कृतीवरून भाजप महिला खासदार आक्रमक झाल्या असतानाच, त्यांच्यावर कारवाईची मागणी सत्ताधारी गोटातून करण्यात येत आली होती. यावर आता हिसुआ मतदारसंघाचे काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

आमदार नीतू सिंह म्हणाल्या की, राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही. जर त्यांना एखाद्याला 'फ्लाईंग किस' द्यायचे असेल तर तो स्मृती इराणींसारख्या ५० वर्षांच्या वृद्ध महिलेला फ्लाईंग किस का देतील ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना फ्लाइंग किस दिल्याच्या कथित वादात आता नव्या वादाची भर पडली आहे. बिहारमधील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी राहुल गांधींना फ्लाइंग किस देण्यास मुलींची कमतरता नाही, असे वादग्रस्त विधान केले आहे. जर त्याला एखाद्याला फ्लाइंग किस द्यायचे असेल तर तो स्मृती इराणींसारख्या ५० वर्षांच्या वृद्धाला का देतील ? असा सवाल उपस्थित केला आहे.

एकीकडे राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किस वादावरुन गुरुवारी भाजपाने जोरदार आंदोलन केले. भाजपाच्या २२ महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या या वर्तनाविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली. दुसरीकडे राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला की नाही ? हे अजून सिद्ध झालेलं नाही.

संसदेत राहुल गांधी यांच्यावरील आरोपांबाबत नवादा जिल्ह्यातील हिसुआ मतदारसंघातून डॉ.नीतू सिंग यांना मत विचारण्यात आले. यादरम्यान भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना जोरदार सुनावले होते. काँग्रेसच्या महिला आमदाराच्या या वक्तव्यावर आता भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. नीतू सिंह यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. नीतू सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.भाजपचे आणखी एक प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही नीतू सिंग यांच्या वक्तव्यावर टीका केली असून, राहुल गांधींच्या कथित चुकीच्या कृत्यांचा बचाव करण्यासाठी महिलाविरोधी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभागृहात 'फ्लाइंग किस' हावभाव दाखवून महिला खासदारांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला. संसदेतील भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाल्या, 'संसदेत महिला खासदारांना केवळ एक महिला विरोधी व्यक्तीच फ्लाईंग किस देऊ शकते. असे उदाहरण यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. यावरून ते महिलाबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. ही असभ्यता असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT