Kangana Ranaut  Sarkarnama
देश

Kangana Ranaut News : दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवल्यानंतर कंगना आता लोकसभेच्या मैदानात उतरणार ? दिले मोठे संकेत

Deepak Kulkarni

Mumbai News : अभिनेत्री कंगना रनौत आपल्या दमदार अभिनयासोबत बेधडक विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे आणि रनौत यांच्यात चांगलेच खटके उडाले होते. एवढेच नव्हे तर तिच्या घरावर बीएमसीमार्फत हातोडा पडला होता. यामुळे त्यावेळी राजकारण चांगलंच तापलं होतं. तसेच कंगना रनौत राजकारणात येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता खुद्द कंगनानेच लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य करणाऱ्या कंगनाने पहिल्यांदाच राजकारणात येण्याविषयी मोठं विधान केलं आहे. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याचे अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली आहे. ती देवर्शनासाठी द्वारकाधीश मंदिरात आली होती. त्यावेळी तिने लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...पण आता राजकारणाशी जोडले जाणे घाईचे ठरेल!

अभिनेत्री कंगना रनौत( Kangana Ranaut) काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कलाकार असल्यामुळे मला राजकारणात रस आहे, पण आता राजकारणाशी जोडले जाणे माझ्यासाठी खूप घाई होईल, अशी भूमिका स्पष्ट केली होती. तसेच मोदी सरकारमुळे देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि आपला भारत दिवसेंदिवस चांगला होत असल्याचे म्हणत कौतुकोद्गगारदेखील काढले होते.

" मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार..."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) आणि यूपीच्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी कंगनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेजस' या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंगही करण्यात आलं होतं. कंगनाने स्वत: ट्विटरवरून याची माहिती देणारे फोटो शेअर केले होते. मात्र, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) मोठं कौतुक केलंय.

मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत, असेही ती म्हणाली. यावर ज्याप्रमाणे एखादा अवतार असतो, तसेच मोदी या देशासाठी एक अवतार आहेत. त्यांचा जन्म भारत देशाच्या उद्धारासाठीच झालाय, असं स्पष्टीकरणही कंगनाने दिलं आहे. याचवेळी नरेंद्र मोदी हे आपले आवडते नेते आहेत आणि तेच आवडते पंतप्रधानही आहेत, असे कंगनाने म्हटले होते.

जर तुमची धारणाच चांगली नसेल तर तुम्ही सर्वात ताकदवाद व्यक्तीबद्दलही अपशब्द काढता, असे कंगनाने म्हटले. तसेच, मला कोणीही ट्रोल केलं तरी फरक पडत नाही. जे लोकं सत्यासोबत आहेत, त्यांना माझं विधान योग्य वाटेल, असा दावाही अभिनेत्री कंगनाने केला होता.

"द्वारका माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही!

द्वारकानगरी ही दिव्य नगरी आहे. कामातून जेव्हा संधी मिळेल, तेव्हा इथे येऊन परमेश्वराचे दर्शन घेतले पाहिजे. सरकारने जर सुविधा उपलब्ध करून दिली तर अशी इच्छा आहे द्वारकेचे जे पाण्याखाली अवशेष आहेत, ते पाहता यावेत. आपल्या महान इतिहासाचे नगर आणि कृष्णाजी यांची नगरी असणारी द्वारका माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नसल्याचेही कंगना या वेळी म्हणाली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT