Mojtaba Khamenei: पूर्व आशियातील अनेक देशांना तेलाचा जवळपास 90 टक्के तेलाचा पुरवठा ज्या मार्गानं होते, ती हार्मुझची सामुद्रधुनी इराणनं सध्या खुली केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळं पश्चिम आशियातील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण आता पुन्हा एकदा चिंतेची बातमी आली आहे. कारण इराणचे नवे सुप्रीम लीडर आयातुल्ला मोजतबा खोमेनेई यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून सर्वांची झोप उडवली आहे.
इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर अयातुल्ला मोजतबा खामेनाई यांनी देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. याद्वारे त्यांनी इराणी नागरिकांना महत्वाचा संदेशही दिला. या संदेशात त्यांनी एक अत्यंत महत्वाची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद राहायला हवं. त्यांनी पुढे म्हटलं की, आम्ही शहिदांच्या हत्यांचा बदल घेण्यामध्ये कुठलीही कसर सोडणार नाही. स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद करण्याचा राजनैतिक लाभ घ्यायला हवा. तसंच अरबांच्या शेजारील देशांवर इराणकडून हल्ले सुरुच राहतील. खामेनेई यांनी यावेळी एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसह युद्धात मृत्यू झालेल्या लोकांचा बदला घेण्याचा संकल्प केला.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी वीजेचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीलाही उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, जर अमेरिकेनं असं केलं तर संपूर्ण क्षेत्र अंधारात बुडून जाईल. तसंच या अंधारापासून सुरक्षेसाठी पळणाऱ्या अमेरिकी सैन्यांचा पाठलाग करण्याच्या अनेक संधी देईल. तसंच इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी दावा केला की, इस्रायली हल्ल्यात युएनच्या जागतीक वारसा स्थळांना निशाना बनवण्यात आलं आहे. यामध्ये काही १४ व्या शतकातील वारसा स्थळ आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.