PM Narendra Modi  Sarkarnama
देश

PM Modi : ' मोदीजी ने घर में झगडा करा दिया.... ! '

PM Modi order : पुरुषांच्या हातात नाही, तर पैसे मातृशक्तीच्या खात्यात जमा करा

Sachin Deshpande

Women Empowerment : ' कही ऐसा तो नही होगा की मोदींजी ने घर में झगडा करा दिया ' असे वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच उच्चारले आहेत. या वाक्याने महिलांसोबतच्या छोट्याशा चर्चा सत्रात मातृशक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि आत्मविश्वास पण निर्माण झाला. आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न मातृशक्तीच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही. यासाठी मातृशक्तीसोबतचा हा संवाद देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा राहील. दुधाची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करणे हे देशाच्या महिला सशक्तीकरणात मोठे पाऊल ठरणार आहे.

वाराणसी येथे बनास काशी संकुल दूध प्रोसेसिंग युनिटच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होते. त्यांनी थेट मुख्यमंत्री व बनास सहकारी दूध संघाला महिलांच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश दिले, तर पुरुषांच्या हातात पैसे देऊ नका, असे सांगत मातृशक्तीचे सशक्तीकरणाचे मोठे पाऊल वाराणसी येथे उचलले आहे. अमूलचे गुजरातचे उदाहरण देताना त्यांनी वाराणसी येथे बनास दूध उत्पादक सहकारी संघालादेखील महिलांच्या खात्यात दुधाचे पैसे टाकण्याचे आदेश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गीर हे देशी गाय आल्यापासून माझ्या घरात उत्पन्न वाढले, हे उत्तर प्रदेशातील भगिंनींसोबत मोदी यांच्या संवादातील उपस्थित माता भगिंनींचे महत्त्वाचे वाक्य होते. या वेळी मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर महिलांना विचारले की, गुजरातमध्ये आम्ही महिलांच्या खात्यात थेट पैसा जमा करतो. इथे महिलांच्या खात्यात दुधाचे पैसे जमा होतात की नाही, अशी विचारणाच त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर महिलांना केली. इतक्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी मातृशक्तीच्या समोर मुख्यमंत्र्यांना सांगितले की, दूध संस्थांद्वारे महिलांच्या खात्यात दुधाचे पैसे जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारला व बनास दूध उत्पादक सहकारी संस्थेला दिले.

गीर गाय वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून मातृशक्ती एकत्र आली होती. या वेळी मोदींनी थेट मातृशक्तींसोबत संवाद केला. गायीसोबत सेल्फी काढता की नाही, अशी विचारणा करताच सभागृहातील अनेक महिलांनी हात वर करत त्यांच्या परिवारातील सदस्य हे गायीसोबत सेल्फी काढत असल्याचे सांगितले. या वेळी गीर गायीच्या दुधाने संपन्नता आल्याचे उदाहरण महिलांनी मोदींसोबत अगदी दिलखुलासपणे संवादातून केले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला आहे. वाराणसी येथे 13 हजार कोटींच्या कामाचा शुभारंभ या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.

अमूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात बोलताना दूध उत्पादनात महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. अमूलच्या यशोशिखरात महिलांच्या कष्टाचा उल्लेख त्यांनी केला. अमूल जगात आठव्या स्थानावर दूध उत्पादन आणि प्रक्रियेत आहे. अमूलने जगात पहिल्या क्रमांकावर आपला डंका वाजवावा, अशा शुभेच्छा मोदींनी नुकत्याच दिल्या. देशात दूध उत्पादनात महिलांचा व्यापक सहभाग आणि आत्मनिर्भरता पाहता मोदींनी मातृशक्तीच्या सशक्तीकरणासाठी दूध उत्पादनाचा शक्तीमार्ग सापडला आहे. त्यावर त्यांनी अमूलच्या कार्यक्रमात तर भर दिलाच पण, वाराणसी येथेदेखील बनास दूध संघाच्या कार्यक्रमातदेखील मातृशक्ती सशक्तीकरणासाठी महिलांच्या खात्यात पैसे टाका पुरुषांच्या नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. पीएम आवास योजनेत ज्याप्रमाणे महिलांच्या नावावर घर करण्यात आले अगदी तसेच मोदींनी थेट महिलांच्या खात्यात दूध संघाने पैसे जमा करण्याचे निर्देश दिलेत.

दूध संघाद्वारे महिलांच्या खात्यात पैसे टाकण्याचे हे छोटे पाऊल भविष्यात महिलांना आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याकडे उचललेले मोठे पाऊल ठरेल. मुद्रा योजनेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जवळपास 30 लाख कोटीं पैकी 70 टक्के कर्ज हे महिलांना दिल्याची माहिती मोदींनी नुकतीच दिली. महाराष्ट्रातदेखील राज्य सरकारने सहकारी संस्थांना महिलांच्या खात्यात दूध संकलनाचे पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादनाचा मोठा प्रोजेक्ट पंतप्रधान मोदींनी दिला, तर निश्चितच शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राचा कलंक मिटल्याशिवाय राहणार नाही. यातून हजारो महिलांच्या नशिबी येणारे अकाली वैधव्य थांबेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT