Three Indian crew members killed in Gulf Iranian strike Sarkarnama
देश

US-Israel War against Iran: इराणचा जहाजावर मोठा हल्ला; तीन भारतीयांचा मृत्यू

Iran attacks ships amid US-Israel war killing Indians: इराण अमेरिका, इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणकडून ओमानच्या समुद्रामध्ये असलेल्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. मोठी क्षेपणास्त्र थेट जहाजांवर टाकली जात आहेत. याचा फटका अन्य देशातील नागरिकांना बसत आहे.

Mangesh Mahale

Global reaction to US-Israel war against Iran: इस्त्रायल आणि इराण युद्धाचे भडका उडल्यानंतर त्याचे चटके जगभरात बसायला सुरवात झाली आहे. भारताला त्याची झळ पोहचली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

इराणकडून एका जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यु झाला असून 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली.

इराण अमेरिका, इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणकडून ओमानच्या समुद्रामध्ये असलेल्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. मोठी क्षेपणास्त्र थेट जहाजांवर टाकली जात आहेत. याचा फटका अन्य देशातील नागरिकांना बसत आहे.

तीन दिवसापासून या युद्धाचा भडका उडाल्यानंतर जगभरातील देशासमोर मोठ संकट उभे राहिले आहे. दिवसेदिवस युद्ध परिस्थिती बिकट होत चालली आहे, दोन्ही बाजूकडील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. . अनेक भारतीय लोक दुबईसह अनेक देशात अडकून पडली आहेत. दुबईत मोठी हल्ले केली जात आहेत. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

21 लोकांना बाहेर काढण्यात यश

एमकेडी व्योममधील तीन भारतीयांचा मृत्यु झाला. ओमान प्रशासनाच्या मदतीने आम्ही भारतीयांना बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहोत. एमकेडी व्योम या जहाजावर मारशॅल आयलॅंडचा झेंडा लावलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या जहाजावर भारतीय लोक कामाला होते, असे ओमाने दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.

तेल टँकरवर हल्ला

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या एकत्रिकपणे केलेल्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केले आहे. संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणकडून खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

ओमानच्या बंदर सुलतान काबूसच्या वायव्येकडील समुद्रात काल (सोमवारी) मंगळवारी एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे. मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या तेल टँकर "MKD VYOM" वर मानवरहित बोटीने हल्ला केला. या घटनेत एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT