Nitin Gadkari News: नगरसेवक तुमच्या बापाचे नोकर नाहीत! गडकरींनी फटकारलं

Nagpur Municipal Corporation Amrit Mahotsav News: नगरसेवक बनणे सर्वात कठीण काम असते. त्याला सकाळी उठल्यापासूनच गटर, नाल्या, साफ सफाईकडे लक्ष द्यावे लागते. मी त्याबाबत सुदैवी ठरलो. मी थेट आमदार झालो....
Nitin Gadkari News
Nitin Gadkari NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मागील कार्यकाळात अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागातच फिरकले नव्हते. ते सर्व निष्क्रिय होते, अशा तक्रारी होत्या. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अशा तब्बल ५६ नगरसेवकांचे तिकीट कापले होते. असे असतानाही पुन्हा एकदा नगरसेवक दिसत नाहीत, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. याची दखल घेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नगरसेवक तुमच्या बापाचे नोकर नाहीत, अशा शब्दात तक्रार करण्याऱ्यांचा समाचार घेतला.

नगरसेवक हे काही पाळीव प्राणी नाहीत. ते तुम्हाला दिसलेच पाहिजे. याचा अर्थ नगरसेवकाने कामच करू नये, असा होत नाही. नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर नगरसेवकांनी कामे केलीच पाहिजे. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. मात्र नगरसेवक रोज दिसलाच पाहिजे हा कोणाचा हट्ट असेल तर तो योग्य नाही असेही गडकरी म्हणाले.

नागपूर महापालिकेचा स्थापना दिन आणि अमृत महोत्सवानिमित्त आज सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयात सर्व माजी महापौर, उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, "नगरसेवक बनणे सर्वात कठीण काम असते. त्याला सकाळी उठल्यापासूनच गटर, नाल्या, साफ सफाईकडे लक्ष द्यावे लागते. मी त्याबाबत सुदैवी ठरलो. मी थेट आमदार झालो. जे नगरसेवक झाले त्यांनी त्यांच्या पक्षाकडे तिकीट मागितले होते. लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ते नगरसेवक झाले. आता त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना जनतेची कामे करावीच लागणार आहे,"

नागपूर शहराच्या विकासात सर्वांचेच योगदान आहे. आज पिण्याच्या पाण्याची समस्या शहरात राहिली नाही. उत्तम उद्याने आणि रस्ते शहरात झाले आहेत. आता काही चौकांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार वाढले आहे. त्याकडे महापालिकेने आता लक्ष द्यावे. मालमत्ता करात वाढण्यात येणार असल्याचे मला समजले. कर वाढवायला हरकत नाही. मात्र जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यावर भार दिला जातो. जे कर भरत नाही, पाणी पट्टी भरत नाही आधी त्यांच्याकडून सर्व कराची रक्कम वसूल करण्याची सूचना गडकरी महापालिकेच्या प्रशासनाला केली.

Nitin Gadkari News
Bal Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव होता..! ATSच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट

काही वस्त्यांमध्ये यापूर्वी एक मजली घर होते. आता पंचवीस पंचेवीस मजल्याच्या इमारती तिथे उभ्या झाल्या आहे. पाच ऐवजी पाचशे कुटुंब एकाच इमारतीत राहायला आले आहेत. दुसरीकडे करदात्यांच्या यादीत वाढ होताना दिसत नाही. अशा लोकांकडे बोट दाखवून सर्वांना कराच्या अखत्यारित आणावे, अशी सूचना यावेळी नितीन गडकरी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com