YS Sharmila, Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Jagan Mohan Vs Sharmila : ...अखेर काँग्रेसनं जगनमोहन यांच्याविरोधात बहिणीला उतरवलंच

Congress : शर्मिलांकडे दिली प्रदेशाध्यक्षपदाची धुरा...

Rajanand More

Andhra Pradesh News : तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता काँग्रेसनं आंध्र प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. वायएसआर काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात काँग्रेसच्या हाती वायएस शर्मिला रेड्डी यांच्या रुपाने मोठा मोहरा लागला आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी असलेल्या शर्मिला यांच्या खांद्यावर आता काँग्रेसनं महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे.  

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) काही महिन्यांत विधानसभा निवडणुका (Assembly Elction) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून (Congress) मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे. जगनमोहन यांच्याविरोधात शर्मिला यांना उभे केले आहे. त्यांच्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जगनमोहन विरुद्ध शर्मिला (YS Sharmila) असा थेट भावा-बहिणीतील लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिदुगु रुद्र राजू (Gidugu Rudra Raju) यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शर्मिला यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी शक्यता होती. त्यानुसार पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत घोषणा केली. राजू यांना कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित म्हणून पद देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शर्मिला यांच्यामुळे काँग्रेसला आंध्र प्रदेशात नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. जगनमोहन हे मुख्यमंत्री होण्याआधी तुरुंगात असताना शर्मिला यांनी संपूर्ण राज्यात पदयात्रा काढली होती. त्याचा फायदा पुढील निवडणुकीत जगनमोहन (JaganMohan Reddy) यांना झाला होता. पण त्यानंतर त्या सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेशातून बाजूला जात असल्याचे संकेत दिले होते. तिथे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आता थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या भावाविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT