INDIA Vs BJP : ‘या’ निवडणुकीनंतर असा असेल स्कोअर : INDIA 1, BJP 0; काँग्रेस-आपचा विश्वास दुणावला

Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत आप व काँग्रेसची आघाडी...
INDIA Vs BJP
INDIA Vs BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : ना विधानसभा, ना लोकसभा... महापौरपदाच्या निवडणुकीने काँग्रेस आणि आपचा विश्वास चांगलाच दुणावला आहे. कारणही तसंच आहे. या दोन्ही पक्षांची या निवडणुकीत आघाडी झाली आहे. त्यामुळे आपलाच विजय होणार असल्याचं भाकीत नेत्यांकडून वर्तवलं जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी आणि निवडणुकीतील विजय दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचं असल्याचं नेत्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

दोन्ही पक्षांमध्ये चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडी झाली आहे. त्यानुसार आपचा (AAP) महापौरपदाचा उमेदवार असेल, तर काँग्रेसकडून उपमहापौरपदाची निवडणूक लढवली जाईल. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) काँग्रेससाठी (Congress) आप हा महत्त्वाचा पक्ष आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या (LokSabha) जागावाटपाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही आघाडी नव्या पॅटर्नची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

INDIA Vs BJP
YS Sharmila : शर्मिला यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये बंड? प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याने उठलं वादळ

आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत मिळणारा विजय इंडिया आघाडीसाठी ऐतिहासिक असेल, असं म्हटलं आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेसाठी इंडिया आघाडी विरुद्ध भारत या लढतीचा महापौर निवडणूक कर्टन रेझर असेल, असा दावाही त्यांनी केला. इंडिया विरुद्ध भाजप अशी पहिल्यांदाच लढत होत असून, त्यामुळे इंडियाचा स्कोअर एक आणि भाजपचा शून्य असेल, अशी घोषणाच चड्ढा यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापौरपदाची निवडणूक इंडिया आघाडीतून पूर्ण ताकदीनिशी लढली जाईल. ही कोणतीही सर्वसामान्य निवडणूक नाही तर इंडिया विरुद्ध भाजपमधील लढत आहे. या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होईल. लोकसभा निवडणुकीतील विजयाची ही सुरुवात असेल. इंडिया आघाडी एकत्रितपणे लढू शकते, हे यातून सिद्ध होईल. एक अधिक एक दोन नव्हे, तर अकरा असेल, असा विश्वास चड्ढा यांनी व्यक्त केला. (Chandigarh Mayor Election)

दरम्यान, चंदीगड महापौरपदाची निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत 35 नगरसेवक मतदान करणार आहेत. भाजपकडे 14 नगरसेवक आहेत. आम आदमी पक्षाचे 13 आणि काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे मिळून 20 नगरसेवक असल्याने निवडणूक सध्यातरी एकतर्फी वाटत आहे. शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी 18 मतांची गरज आहे. या निवडणुकीत भाजपकडूनही जोर लावला जाण्याची शक्यता आहे.

R...

INDIA Vs BJP
Congress-AAP Politics : अखेर काँग्रेस अन् आपची आघाडी; पहिल्याच निवडणुकीत देणार भाजपला धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com