ED Raid : मुख्यमंत्र्यांनी कालच भ्रष्टाचाराचा आरोप केला अन् आज महेश जोशींच्या घरी ‘ईडी’ची रेड

Mahesh Joshi : महेश जोशी हे गेहलोत सरकारमध्ये होते मंत्री...
Mahesh Joshi
Mahesh JoshiSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोमवारी बान्सवाडा येथे जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसचे नेते व माजी मंत्री महेश जोशी यांचे घर व कार्यालयात छापेमारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थानातील राजकारण तापलं आहे.

बान्सवाडा येथे एका सभेत बोलताना मुख्यमंत्री शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी म्हटले होते की, जल जीवन मिशन योजनेसाठी देण्यात आलेल्या दोन हजार 500 कोटी रकमेपैकी केवळ 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने केंद्र सरकारकडून कारवाई केली जाईल. (ED Raid)

Mahesh Joshi
YS Sharmila : शर्मिला यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये बंड? प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याने उठलं वादळ

शर्मांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी ईडीची टीम जोशींच्या (Mahesh Joshi) घरी व कार्यालयात पोहोचली. बान्सवाडासह जयपूरमध्येही छापेमारी सुरू आहे. जोशींसह काही ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या घरीही रेड टाकण्यात आल्याचे समजते. हे सर्व जण जोशी यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. योजनेमध्य़े कथित 900 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी (Corruption) तपास सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ईडीकडून आधीपासूनच योजनेती कथित भ्रष्टाचाराची चौकशी केली जात आहे. आज तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली आहे. याआधी जवळपास 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यामध्ये आयएएस अधिकारी सुबोध अग्रवाल यांच्याही ठिकाणांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या जयपूर येथील निवासस्थानी रेड टाकण्यात आली होती. यावरून अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली होती. भाजप राजकीय हेतूने प्रेरित होत केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हे राजकारण केले जात असल्याचे गेहलोत म्हणाले होते.

R...

Mahesh Joshi
INDIA Vs BJP : ‘या’ निवडणुकीनंतर असा असेल स्कोअर : INDIA 1, BJP 0; काँग्रेस-आपचा विश्वास दुणावला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com