TMC Crisis : तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांच्याबाबत एका खासदाराने धक्कादायक दावा केला आहे. लोकसभेतील चर्चेदरम्यानची एक घटना सांगत या खासदाराने पठाण यांना आंदोलन करण्यापासून कसे रोखण्यात आले, त्यांना गुजरातमधील घराची कशी भीती घातली, त्यावर महुआ मोइत्रा काय म्हणाल्या... अशा संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार अगा सईद रुहुल्लाह मेहदी यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संसदेच्या मागील हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून एसआयआर आणि इतर मुद्यांवरून लोकसभेत आंदोलन केले जात होते. नेहमीप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे खासदार आक्रमकमध्ये सहभागी झाले होते. मी तिथेच होतो.
एका मुस्लिम खासदाराने (टीएमसीतील नाही) युसूफ पठाण यांना आंदोलनात सहभागी होऊ नकोस, असे ओरडून सांगितले. युसूफ यांनीही माघार घेत ते आपल्या जागेवर येऊन बसले. ते थरथरत होते. ते खासदार गेल्यानंतर मी युसूफ यांच्याजवळ गेलो आणि विचारले, काय झालं? तुम्ही का घाबरला?, असे मेहदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
युसूफने मला सांगितले की, भाजपविरोधात आंदोलन करू नको, असे तो खासदार म्हणाला. शत्रू का बनवत आहेत. भाजपविरोधात आंदोलन का करतोय. गुजरातमधून तुझ्या घरावर बुलडोझर चालवतील, अशी भीती त्या खासदाराने घातल्याची माहिती युसूफ यांनी दिल्याचे मेहदी यांनी सांगितले.
ही चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा तिथे आल्या. त्यांना जे घडले ते सांगितले. हे ऐकून महुआ या युसूफला म्हणाल्या, त्या व्यक्तीचे ऐकू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण एकत्र आहोत. तुमच्या कुटुंबाला स्पर्शही करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असा दिलासा महुआ यांनी युसूफ यांना दिल्याचे मेहदी यांनी सांगितले. मला महुआ मोइत्रा आणि तृणमूलची दया येते. ते त्याच्या पाठीशी उभे राहिले अन् त्याने पाठीत खंजीर खुपसला, अशी खंतही मेहदी यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.