Pravin Swami .jpg Sarkarnama
फिटनेस

Pravin Swami Fitness Routine : नेत्यांचा फिटनेस : व्यायाम, सात्विक आहार अन् ध्यानधारणेतून मिळते ऊर्जा

Political Leaders Fitness Funda : रोजच्या कामात कितीही व्यग्र असलो, तरीही दिवसाची सुरुवात मात्र कटाक्षाने नियमित व्यायामाने करतो. रात्री झोपण्यास उशीर झाला तरीही पहाटे मात्र ठरल्या वेळेवर उठतो. अथवा बाहेर असल्यास नेहमी चालण्याच्या सवयीप्रमाणे हलका व्यायाम व योगा प्राणायामासह, ध्यानधारणा देखील करतो.

सरकारनामा ब्यूरो

Umarga News : शिक्षकी पेशा सोडून समाजकारण आणि त्यानंतर राजकारण आणि त्यात होणारी प्रचंड धावपळ या पार्श्वभूमीवर शारीरिक तंदुरुस्ती अत्यावश्यक आहे. रोजच्या व्यायामामुळेच सतत उत्साही राहून आत्मविश्वासासह दिवसभर ऊर्जाही मिळते. त्यामुळे कामामुळे कुठेही असलो तरी व्यायामात मात्र कधीच अंतर पडू देत नाही. वेळेवर सात्त्विक शाकाहारही घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आरोग्य जपण्यासाठी पुरेसा व्यायाम, सात्त्विक आहार, ध्यानधारणा व पुरेशी विश्रांती महत्वाची आहे. आमदार होण्यापूर्वी प्राथमिक शाळेत शिक्षक असणारे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी (Mla Pravin Swami) हे आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडत होते.

प्रचंड धावपळ, ताणतणाव तसेच वेगवान जीवन यामुळे राजकारण्यांना मानसिक तंदुरुस्तीची आवश्यकता असते. यासाठी मी जुनी गाणी ऐकणे, संगीत ऐकणे आणि पुस्तकांचे वाचन करणे, आपल्या विषयाशी संबंधित साहित्याचे वाचन करण्यास पसंती देतो. चालणे, व्यायाम, सात्त्विक शाकाहार, पुरेशी विश्रांती हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे.

आमदार (MLA) झाल्यानंतर रोजच्या कामात व जनसंपर्कातही प्रचंड वाढ झाली. मात्र, काम व जनसंपर्क वाढला तरीही रोजच्या या धावपळीच्या दिनक्रमात मी माझ्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. फिटनेससाठी पहाटे लवकर उठून दररोज किमान तासभर नियमित व्यायामासाठी वेळ देतो. कामानुसार कुठेही असली तरी व्यायामात मात्र कधीच अंतर पडू देत नाही. तसेच योग्य आहार व वेळेवर जेवण घेण्यास माझे प्रथम प्राधान्य असते.

शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून तसेच समाजकारणात व राजकारणात काम करतानाही माझी पहिली आवड फिटनेस व खेळ हीच आहे. क्रिकेटसह विविध खेळांचीही आवड जोपासत वयाच्या 47 व्या वर्षीही स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी मी सतत दक्ष राहतो. माझे वजनही नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. व्यायामाची आवड असल्याने रोजचा व्यायाम, कसरत असतेच. तसेच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलसारख्या मैदानी खेळांचीही आवड असल्याने शक्य होईल त्यावेळी मित्रांसोबत आवर्जून या खेळांमध्ये सहभागी होतो.

भरपूर पाणी पितो अन् घरची भाकरी...

रोजच्या आहारावरही नियंत्रण ठेवून भरपूर पाणी पिणे पितो. रोजच्या आहारात मी घरच्या सात्विक जेवणाला प्राधान्य देतो. हॉटेलचे मसालेदार खाणे तसेच चहा, कॉफी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न असतो. सकाळी ज्यूस, फळे, शेंगांचे लाडू, ड्रायफ्रूट यांना प्राधान्य देतो. दिवसभरात नाश्ता, दुपारी जेवण व रात्रीचे जेवण असा सात्विक आहार घेताना त्यात ज्वारीची भाकरी, पालेभाज्यांचा समावेश असतो.

दिवसभरात घराबाहेर असताना दुपारी व सायंकाळच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे अवघड होत असल्याने सोबत घरच्या जेवणाचा डबा, डबा नसेल तर हलका आहार घेतो. व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार व मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून नव्या पिढीने वेळेतच याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

दिवसाची सुरुवात व्यायामानेच...

रोजच्या कामात कितीही व्यग्र असलो, तरीही दिवसाची सुरुवात मात्र कटाक्षाने नियमित व्यायामाने करतो. रात्री झोपण्यास उशीर झाला तरीही पहाटे मात्र ठरल्या वेळेवर उठतो.अथवा बाहेर असल्यास नेहमी चालण्याच्या सवयीप्रमाणे हलका व्यायाम व योगा प्राणायामासह, ध्यानधारणा देखील करतो. त्यानंतर नियमित कामांना सुरुवात करतो. पहाटे व्यायाम नाही जमल्यास रात्री जेवल्यानंतर काही वेळ शतपावली, शाकाहार करून पुरेशी विश्रांती घेतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT