Umarga Vidhansabha : शिंदेंच्या माजी आमदारामुळे ठाकरेंच्या 'या' शिलेदाराची आमदारकी धोक्यात?

Pravin Swami Caste Certificate : ठाकरेंच्या शिवसेनेचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. कारण प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Eknath Shinde | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. कारण प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) विधानसभा निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी होईपर्यंत प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांनी जात पडताळणी समिती धाराशिव आमदार स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधते बाबात तक्रार दाखल केली होती. मात्र, या समितीने याबाबतची सुनावणी घेण्याचे अधिकार घेण्याचा आधिकार नसल्याचं सांगत ही तक्रार फेटाळली. त्यानंतर चौगुले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'एसआयटी'चे प्रमुख बसवराज तेलींचं धस 'कनेक्शन'?

याच याचिकेवर उच्च न्यायालयात फेब्रुवारीमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाकडून प्रवीण स्वामी यांना याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानराज चौगुलेंचा पराभव केला आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
Nylon Manja Video : अन् मांजाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं.., मे महिन्यान होतं लग्न त्याआधीच तरुणाचा दुर्देवी मृत्यू

ज्ञानराज चौगुले या मतदारसंघातून सलग तिनवेळा विजयी झाले होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चौगुले यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर ठाकरेंची साथ सोडल्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com