Congress, NCP vs BJP : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यावेळी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या काही नोटा मिळाल्या आहेत. तसेच काही चिठ्ठ्याही मतपेटीत आढळून आल्या आहेत. त्यातून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानपिचक्या घेत सल्लाही दिला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kolhapur) निवडणुकीचा निकाल आता हाती येऊ लागलेला आहे. आतापर्यंत या बाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. तर विरोधी गटाच्या पॅनलने आपले खाते उघडले आहे. तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, या बाजार समितीच्या मतपेट्यामध्ये काही चिट्ठ्या आणी पाचशे रुपायांच्या दोन नोटा मिळाल्या आहेत.
निवडणुकीवेळी उमेदवारांकडून अनेकांना पैसे वाटण्यात आलेले आहेत. त्यातील एका मतदाराने मिळालेले पैसे प्रामाणिकपणे मतपेटीद्वारे परत केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील या प्रामाणिक मतदाराने उमेदवारांनी दिलेले पैसे निवडणूक आयोगाला (Election Commission) जमा करावे, अशीही विनंतीही चिठ्ठीद्वारे केली आहे. मतमोजणी करत असताना कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा आणि चिठ्ठी मिळाली आहे. दरम्यान, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतपेटीत काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्या चिठ्यामधून नेत्यांना कार्यकर्त्यांना कानपिचक्या आणि सल्लाही त्या प्रामाणित मतदाराने दिला आहे.
दरम्यान, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आता हाती येऊ लागलेला आहे. जसजसे निकाल येतील त्या पद्धतीने विविध गटांचे कार्यकर्ते जल्लोष करत गुलालाची उधळण करीत आहेत. आतापर्यंत या बाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. तर विरोधी गटाच्या पॅनलने आपले खाते उघडले आहे. तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Kolhapur) निकाल एक-एक करत पुढे येत आहे. सध्या बाजार समितीसाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील एका-एका उमेदवाराची निवड झाली आहे. आडते गटातून सत्ताधारी गटातील एक उमेदवार तर विरोधी गटातून एक उमेदवार विजयी झाला आहे. यात सत्ताधारी गटाचे वैभव सवर्डेकर तर विरोधी आघडीतून मधून नंदकुमार वळंजू विजयी झाले आहेत.
कोल्हापूर बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती मधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटातून पांडुरंग काशीद यांच विजय झाल आहे. हे चारही उमेदवार सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आघाडीचे उमेदवार आहेत.
कोल्हापूर बाजार समिती दृष्टीक्षेपात
एकूण जागा - 18
आतापर्यंत लागलेले निकाल - 7
सत्ताधारी गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,जनसुराज्य) - ५
विरोधी गट - (भजपा , शिंदे गट)- १
अपक्ष - १
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.