Jalgaon Market Committee Result : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपद निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धक्का बसला आहे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास पॅनलने 11 जागावर आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर मंत्री पाटील यांच्या पॅनलला सहा जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे.
जळगाव बाजार समितीचा पहिला कौल महाविकासच्या बाजूने आला होता, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून दिलीप काशिनाथ कोळी विजयी झाले. त्यानंतर सर्वसाधारण गटातून महापौर जयश्री महाजन यांचे पती महापालिकेतील शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन तब्बल ४०० मते घेवून विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीला तब्बल 11 जागा मिळत असून, शिवसेना शिंदे गट भाजपला सहा जागा मिळणार आहेत. तर एक अपक्ष निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना हा धक्का मानला जात आहे. जळगाव बाजार समितीत त्यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता होती. ती आता खालसा झाली असून महाविकासची सत्ता स्थापन होणे निश्चीत झाले आहे.
दरम्यान, धरणगाव बाजार समिती मतदार संघात गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलची आघाडी आहे. १८ पैकी तब्बल ८ जागावर विजय मिळाल असून ९ जागावर आघाडी आहे. महाविकास आघाडी केवळ दोन जागेवर आघाडीवर आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा गट तसेच भाजपही (BJP) शिंदे गटासोबत आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव बाजार समितीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. या ठिकाणी जिल्हा बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय पवार यांनी मंत्री पाटील यांच्या पॅनलला साथ दिली आहे. आज झालेल्या मतमोजणीत हमाल मापाडी संघातून एक तर ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी मतदार संघातील दोन जागा मंत्री पाटील यांच्या सहकार गटाला मिळाल्या आहेत. तर इतर गटातील तब्बल ९ उमेदवार आघाडीवर आहेत. १८ पैकी १६ जागावर पाटील यांनी ताबा मिळविला आहे. तर महाविकास आघाडी केवळ दोन मतदार संघात आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.