Satej Patil, Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay Mahadik sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur : महाभारत घडलंच तर जनता पांडवाचे रूप घेईल... सतेज पाटील

संभाजी थोरात

कोल्हापूर : आम्ही रामायण करणारी मंडळी आहोत. जे चांगले करता येईल ते आम्ही करतो. महाभारत घडलंच तर पांडवांचे रूप घेऊन जनता काय करायचं ते करेल, असा टोला माजी मंत्री सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

विविध विषयांवर सतेज पाटलांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. गोकुळच्या सभेविषयी विचारले असता सतेज पाटील म्हणाले, सत्ताधारी पक्ष म्हणून गोकुळची सभा मी चालवणार आहे. यापूर्वी सभा गुंडाळण्याचे प्रकार झाले होते, ते आम्ही करणार नाही. गोकुळमध्ये 35 वर्षानंतर सत्तांतर झाले. शेतकऱ्यांची सत्ता गोकुळवर आहे. शेतकऱ्यांचा फायदा करून देण्याचा शब्द आम्ही पूर्ण केलेला आहे. पावसाचा विचार करून जिल्ह्यातील लोकांचा विचार करून सभेचे ठिकाण आम्ही निवडलं आहे.

यापूर्वी महाभारत घडलं आहे. पण, आम्ही रामायण करणारी मंडळी आहोत. जे चांगल करता येईल ते आम्ही करत असतो. महाभारत घडलं तर जनता पांडवाचे रूप घेऊन काय करायचं ते करेल. गेल्या अडीच वर्षात मी आणि हसन मुश्रीफ यांनी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून निवडणूका लांब आहेत, त्यावेळी योग्य उत्तरे दिली जातील.

मंडलिकांविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, स्थानिक पातळीवर खासदार मंडलिक आमच्यासोबत राहणार याची खात्री आहे. याबाबत आमची अनेक वेळा चर्चा झाली आहे.कोल्हापूरच्या हद्दवाढीविषयी ते म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना विश्‍वासात घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत. यात कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये, असा इशारा ही त्यांनी दिला.

गुलाबनबी आझाद यांच्या भूमिकेविषयी विचारले असता सतेज पाटील म्हणाले, काँग्रेसमधील सगळ्याच जेष्ठांनी आता राहुल गांधींच्या पाठीशी राहिले पाहिजे. ज्यांनी चाळीस पन्नास वर्षे सत्तेच्या माध्यमातून अनेक पद घेतली. त्यांनी आता सोबत राहावं. आमचं पुढचं पंधरा ते वीस वर्षाचा भवितव्य या पक्षात आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT