Chandrakant Patil, Uddhav Thackeray Sarkarnama
कोल्हापूर

Chandrakant Patil : "उपकाराची भावना ठेवली असती तर 2019 लाच..."; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

Rahul Gadkar

Kolhapur News, 02 Oct : 2024 ला तिन्ही पक्षांच्या मिळून 170 च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अनेक चांगल्या योजना या सरकारने लोकांसाठी आणल्या आहेत. या योजना आणूनही मनात उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही.

उपकाराची भावना काहींनी ठेवली असती तर 2019 लाच युतीचे सरकार आलं असतं. आता त्यांचं जे नुकसान झालं ते झालं नसतं, असा खोचक टोला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.

ते कोल्हापुरातील खानापूर येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी देवेंद्र भुयार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना भुयार माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले के माहिती नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन, असं पाटील म्हणाले.

राधानगरीची जागा आबिटकरांचीच

कितीही मारामाऱ्या झाल्या तरी सीटिंग सीट ही त्याच पक्षाला मिळेल. त्यामुळे राधानगरीची जागा प्रकाश आबिटकर यांनाच मिळेल. अडचणीच्या काळात जे सोबत आले त्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कधीही अंतर देत नाहीत. त्यामुळे इथले आमदार आबिटकरच असतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते 2029 बाबत बोलले असतील असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तर यावेळी शाह यांच्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर देखील त्यांनी हल्लाबोल केला.

पाटील म्हणाले, "परमेश्वर, महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊत करू शकतात. 370 कलम रद्द केलं म्हणून अमित शाह यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. पण असं काम असणाऱ्यांवर टीका करण्याचं काम हे राऊतच करू शकतात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT