Pune BJP: भाजपचे नेते भिडले; प्रस्थापितांनी केली इच्छुकांची नाकेबंदी, बैठकीत काय घडले?

Khadakwasla Assembly Constituency BJP MLA Bhimrao Tapkir: प्रसन्न जगताप, दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Pune BJP
Pune BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी भाजपकडून राबवण्यात आलेली एमपी पॅटर्न आधारित निवडणूक प्रक्रिया चांगली चर्चेत आली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रस्थापितांनी नव्याने निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांची नाकेबंदी केल्याचं चित्र समोर आलं आहे. बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या राज्यभर राबविण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया भाजपच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने चर्चेत आली आहे. सध्या पुणे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून तीन ते चार इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या सोबतच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, दिलीप वेडे पाटील आणि दीपक नागपुरे यांचे नाव चर्चेत आहे. यापैकी एक नाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी निश्चित होऊ शकतं मात्र तत्पूर्वी काल झालेल्या भाजपच्या बैठकीत

आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप, भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी आल्याची माहिती समोर आली आहे. भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारामध्ये बाचाबाची झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलून देण्याचा आरोप भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार भाजपचे केंद्रातून आलेले निरीक्षक मुन्ना महाडिक यांच्यासमोर आला असून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन इच्छुकांचे गट आमने-सामने ठाकले असल्याचं पाहायला मिळालं.

Pune BJP
Pune BJP: पुण्यातील भाजप इच्छुकांनी वाजवला 'एम पी पॅटर्न' चा बँड; नेमकं काय घडलं?

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीनदा आमदार झाले आहेत. आता चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. यामुळे यंदा त्यांच्या बाबत मतदारसंघांमध्ये अँटिकंबन्सी असल्याचं इतर इच्छुक सांगत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत आणि हाच वादाचा मुद्दा ठरला आहे.या बाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार भीमराव तापकीर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com