Supporters and leaders await results of the Kagal municipal elections, seen as a decisive test for the Mushrif–Ghatge political alliance in Kolhapur district. Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Politics : तीन नगरपालिकांचा निकाल कागलमध्ये गेम फिरवणार, 8 मतदारसंघांसह मुश्रीफ- घाटगे युतीची धाव कुठपर्यंत हे ठरवणार ?

Kagal Municipal Election : कागल, मुरगुड व गडहिंग्लज नगरपालिकांचे निकाल मुश्रीफ–घाटगे युतीला जनमान्यता मिळाली की नाही हे ठरवतील आणि आठ मतदारसंघांच्या राजकारणावर परिणाम करतील.

Rahul Gadkar

Kagal News : कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची युती. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन मातब्बर नगरपालिका निवडणुकीत एकत्र येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

कोल्हापूर जिल्ह्यातील या तीन नगरपालिका निवडणुकीच्या निकालांची 21 डिसेंबर रोजी घोषणा होणार आहे. केवळ कागलच नव्हे तर कागल विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुरगुड आणि गडहिंग्लज नगरपालिकांमध्ये आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आठ मतदारसंघांचे भवितव्य या निकालावर अवलंबून असणार आहे. घाटगे मुश्रीफ यांची युती ही सर्वसामान्य मतदारांना पटली का? हे या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून मुश्रीफ आणि घाटगे गटाचा संघर्ष धगधगत राहिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील गाव पातळीवर घाटगे मुश्रीफ असा संघर्ष गटात आहे. प्रत्येक गटात डझनभर पदाधिकारी गावागावात आहेत. गेल्या अकरा वर्षांच्या काळात जितका टोकाचा संघर्ष या दोन गटाने केला. इतकीच ईर्षा या दोन गटात झाली आहे. मात्र दोघांच्या युतीने कागल विधानसभा मतदारसंघातील गावागावात त्याचा परिणाम झाला आहे. कागल तालुक्यातील सहा जिल्हा परिषदेचे मतदार संघ आणि गडहिंग्लज, कडगाव जिल्हा परिषदेचा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात येत असल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत.

ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकांमध्ये या दोघांची युती झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाली. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील हेच परिस्थिती असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात अनेकाने तयारी केली होती. मात्र एनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली.

या परिस्थितीत गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. या दहा वर्षात घाटगे आणि मुश्रीफ गटांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र दोघांची युती झाल्याने आणि राज्याच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील दोघांना एकत्र राहावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा सुवर्णमध्य मार्ग काढत एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज होऊन बंडखोरांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे भाजपचे नेते संजय घाटगे यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. मात्र आजवरचा इतिहास पाहिल्यास घाटगे गटाने केवळ आपल्या घरापुरतीच उमेदवारी मर्यादित ठेवले आहे. त्याला वरचढ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचा गट आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असल्याने मतदारसंघातील गट तितकाच प्रभावशाली आहे.

पण दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र लढत झाल्यास शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाचा देखील विचार करावा लागणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुश्रीफ घाटगे एका बाजूला आणि मंडलिक एका बाजूला असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हीच परिस्थिती राहणार की? एकत्र लढणार यावर बरसेकाही अवलंबून आहे.

मुरगूड, कागल आणि गडहिंग्लज नगरपालिका निकालावर ठरणार भवितव्य

कागल नगरपालिकेत मुश्रीफ-घाटगे यांची युती राहिले. भाजपने (BJP) या ठिकाणी छुपी भूमिका घेतली. पण मुश्रीफ घाटगेंच्या बॅनरवर माजी आमदार संजय घाटगे यांचा फोटो राहिला. पण प्रचारात दिसले नाहीत. तर माजी खासदार संजय मंडलिक विरोधात राहिले. पण केवळ एक सभा कागलमध्ये घेतली. हीच परिस्थिती मुरगूडमध्ये राहिली. इकडे मंडलिक यांना संजय घाटगे यांचा पाठिंबा होता. तर त्यांच्या विरोधात मुश्रीफ आणि राजे घाटगे गट होता.

मंडलिक या ठिकाणी तळ ठोकून होते. गडहिंग्लज मध्ये मुश्रीफ-राजे गट एका बाजूला आणि भाजप, शिवसेना आणि जनता दल एका बाजूला होता. त्यामुळे या निकालावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT