Nilesh Rane, Ravindra Chavan
Nilesh Rane, Ravindra ChavanSarkarnama

Vidhan Bhavan drama: विधानभवनाबाहेर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’! निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे निलेश राणेंसमोर रवींद्र चव्हाण आले अन्...

Nilesh Rane News : निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये गेल्या काही दिवासांपासून तणाव निर्माण झाला होता.
Published on

Nagpur News : मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान गेल्याच आठवडयात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. या वादातूनच निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे निवडणूक काळातच वातावरण चांगलेच तापले होते. तर दुसरीकडे निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माणही झाला होता. मात्र, निवडणुका संपताच हा दोघांतील वादावर पडदा पडला असून नागपुरात विधानभवन परिसरात सोमवारी निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर आले. त्यांच्या भेटीनंतर विधानभवनाबाहेर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पहावयास मिळाला.

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्षाची चर्चा सर्वत्र झाली. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटप केल्याचा थेट आरोप निलेश राणे यांनी केले होते. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील आरोप फेटाळत निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला होता.

Nilesh Rane, Ravindra Chavan
BJP Secret Files : भाजपच्या कारनाम्यांची 'सिक्रेट फाईल' उद्धव ठाकरेंच्या हाती; भ्रष्टाचार अन् पाच वर्षात..., वसंत मोरेंच्या दाव्याने खळबळ

निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये गेल्या काही दिवासांपासून तणाव निर्माण झाला होता. तसेच निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर आरोप केल्यानंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणानंतर सोमवारी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हे समोरा-समोर आले होते.

Nilesh Rane, Ravindra Chavan
Shivsena UBT : खैरेंच्या विरोधानंतरही दानवे माजी आमदाराला घेऊन ठाकरेंच्या भेटीला : मातोश्रीवर काय घडले? सांगितली Inside Story

सोमवारी दुपारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावेळी निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे निलेश राणेंसमोर रवींद्र चव्हाण आले अन् दोघांनी यावेळी विधीमंडळ परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर माझे आणि रवींद्र चव्हाण यांचे काहीही वितुष्ट नाही. जे काही होते ते निवडणुकीपुरते होते, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली. यावेळी रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असेही निलेश राणे यांनी सांगितले.

Nilesh Rane, Ravindra Chavan
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

मालवणमधील निवडणुकीदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी 26 नोव्हेंबर मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. यानंतर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती.

पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही निलेश राणेंनी केला. दरम्यान, बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार विजय केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नगरपालिका निवडणूक काळात राणे-चव्हाण या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला.

Nilesh Rane, Ravindra Chavan
BJP Vs Shivsena : बोर्ड फाडले, लाथा घातल्या, कानाखाली मारल्या... वरळीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भाजप-ठाकरेंच्या सेनेत तुफान राडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com