Ajit Pawar on shinde fadnavis govt : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला शनिवारी खडेबोल सुनावले. ते कोल्हापुरात बोलत होते.
"अरे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काय काय केलं हे जनतेला माहित आहे. या वर्षभरात गद्दार शब्द, पन्नास खोके हे शब्द जनतेले पटले आहेत. या सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे," असे अजित पवार म्हणाले. "कर्नाटक निवडणुकीत जे घडले, तेच महाराष्ट्रात घडेल, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नाही," असे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या कारभारावर अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला. "राज्याचा विकास व्हावा, असेच आम्हाला वाटेत. राज्यावर 1 लाख कोटीची बिले देणे बाकी आहेत. राज्यात भ्रष्टाचार वाढलाय. राज्यकर्त्यांना 10-11 महिने झाले आहेत. जूनमध्ये 12 महिने होतील. आर्थिक शिस्त कुठे गेली. वर्षभरात गद्दार, 50 खोके शब्द जनतेला पटलेला आहे. तुम्ही काय काय केले हे जनतेला माहित आहे," असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, "आम्ही एक प्रकारची आर्थिक शिस्त ठेवली होती. आमची एवढीच भावना असते की विकास झाला पाहिजे. कोरोनाचं सावट असताना मी राज्याचा अर्थमंत्रीही होतो. त्यावेळी अँब्युलन्स, कोरोना व्हॅक्सिनचे डोस, जंबो रुग्णालय यासह आम्ही कमी पडलो नाही. उत्पन्न घटलं होतं पण आम्ही राज्याला पुढे नेत होतो,"
"सत्ता बदलत असते. हे कायमचे बसायला गेलेले नाही. जनता दाखवून देईल उद्याच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात कसे दाखवले. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. सरकार बदलल्यावर आम्ही त्यांची कामे बंद केली नाहीत," असा टोला अजित पवारांना सत्ताधाऱ्यांना हाणला.
"आम्हालाही वाटतं की विकास झाला पाहिजे त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. कोल्हापूरचा विकास करत असताना इथली रांगडी माती, इथला निसर्ग या सगळ्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
"लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना असावी, जातीय सलोखा राहावा. मी अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले, जयंत पाटील, सुनिल तटकरे यांनी देखील अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मात्र आता राज्यात आर्थिक शिस्त राहिलेली नाही," अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
(Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.