Maharashtra Politics : 'पोपट मेला' वरुन अजितदादांनी विरोधकांची पिसं काढली..; फडणवीसांची उडवली..

Maharashtra Politics : सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा..
Maharashtra Politics  NEWS
Maharashtra Politics NEWS Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : गेल्या काही काही दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारणं पोपटाभोवती फिरतयं. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. त्यावरुन महाविकास आघाडीतील नेते व सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

राज्यात ‘पोपटा’वरून राजकारण रंगलयं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पोपट मेलाय’ असे वक्तव्य करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ‘पोपट अजून जिवंत आहे’ असे म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. अशातच आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी मारली आहे.

"ठाकरे गटाची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही. तरीही उद्धव ठाकरे म्हणतात न्यायालयाचा निकाल सर्वांपर्यंत पोहोचवा.त्यामुळे बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नुकताच पुण्यात लगावला.

Maharashtra Politics  NEWS
Jayant Patil Statement: "नार्वेकर आमचे जावई.. ते तसं करणार नाहीत"; जयंत पाटील असं का म्हणाले..

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर फडणवीस म्हणाले, "पोपट काही खात नाही, पीत नाही. बोलत नाही. मान हलवत नाही. पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर ठाकरेंची अवस्था झाली आहे”, असं फडणवीस म्हणाले. 'पोपट मेलाय,' असं त्यांना सांगायला पाहिजे, असे ते म्हणाले. यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी फडणवीसांवर सुनावलं. राऊत नांदेड येथे बोलत होते.

Maharashtra Politics  NEWS
Karnataka CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन नेते नाराज ; पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी..

राऊतांच्या या प्रतिक्रियेनंतर अजित पवार यांच्या बोलण्यातूनही पोपट सुटला नाही. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पोपटावरुन कलगीतुरा रंगला आहे. अशातच अजित पवारांनी पोपटावरुन टीका करणाऱ्यांची पिसं काढली आहेत. "पोपट मेला नाही, मैना मेली नाही, मोर मेला नाही. सगळे जिवंत आहे. कोण कुठं मेलय दाखवा," अशा शब्दात अजित पवारांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

Maharashtra Politics  NEWS
Nana Patole Criticized Sanjay Raut: जागावाटपावरुन आघाडीत कलगीतुरा; पटोलेंचा राऊतांना सल्ला, 'आम्ही इतक्या जागा..'

हे जनता दाखवेल..

"शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' पुस्तकात फडणवीसांवर सुद्धा काही वाक्य आहेत. ती त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होती. ते म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे त्यांना कळेल. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे चित्र दिसलं ती फक्त झलक आहे.१४ महापालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या, मग कळेल कुणाचा पोपट मेलाय. हे जनता दाखवेल," अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला. "घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे," असेही ते म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com