Subhash Maharia Join BJP : काँग्रेसला मोठा धक्का ; तीन वेळा खासदार असलेले माजी मंत्री भाजपमध्ये..

Subhash Maharia Join BJP : महरिया हे 1999 मध्ये वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
Subhash Maharia Join BJP
Subhash Maharia Join BJPSarkarnama

Subhash Maharia Join BJP : कर्नाटकमध्ये काँग्रेस आज सत्तास्थापन करणार करीत असताना राजस्थानमध्ये मात्र काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. (rajasthan subhash maharia left congress sikar mp join bjp in jaipur)

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच माजी मंत्री सुभाष महरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी व विरोधी पक्षनेता राजेंद्र राठौड यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Subhash Maharia Join BJP
Nana Patole Criticized Sanjay Raut: जागावाटपावरुन आघाडीत कलगीतुरा; पटोलेंचा राऊतांना सल्ला, 'आम्ही इतक्या जागा..'

सुभाष महरिया हे 1998, 1999 आणि 2004 मध्ये सीकर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. महरिया हे 1999 मध्ये वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

एका अर्थानं सुभाष महरिया यांनी घर वापसी केली आहे. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, २०१४ मध्ये त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सचिन पायलट यांच्या प्रयत्नांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Subhash Maharia Join BJP
Maharashtra Politics : 'पोपट मेला' वरुन अजितदादांनी विरोधकांची पिसं काढली..; फडणवीसांची उडवली..

आता त्यांनी घर वापसी केल्यानंतर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यांना सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ येथून उमेदवारी मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Subhash Maharia Join BJP
Karnataka CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन नेते नाराज ; पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी..

त्यांना येथून तिकीट मिळाले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्याशी त्यांची लढत होईल, अशी चर्चा आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात काम केलेले महरिया यांची जाट समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २०११ मध्ये ते भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com