Kolhapur Police : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्यातील नेते, अधिकारी, महापालिकेचे महापौर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी इंधन बचावसाठी काटकसर सुरु केली आहे. यात कोल्हापूर पोलीस दल मागे राहिले नाही. पोलीस दलाने देखील वाहनांच्या सेवेत कपात केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या नेत्यांचाही सुरक्षेत कपात होणार आहे.
जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधीक्षकांसह अधिकारी, पोलिस ठाण्याचे निरीक्षक, निर्भया पथक, डायल ११२ यंत्रणेसह विविध विभागात ४३५ वाहने रस्त्यावर असतात. महिन्याला जवळपास ३७ लाख रुपयांपर्यंतचा खर्च इंधनावर केला जातो. यामध्ये मोटार वाहन विभागातील वाहने तसेच पोलिस ठाण्याकडील चारचाकी, दुचाकी वाहनांचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंघाने ही वाहने नागरिकांच्या सेवेसाठी धावतात. मात्र, आता शासनाकडून 'झेड प्लस' सुरक्षा यंत्रणेतील चार वाहने कमी करण्याचा निर्णय झाला असून, याचा कितपत परिणाम होतो हे पहावे लागेल.
निर्भया पथके, दामिनी पथके, डायल ११२ वाहने नागरिकांच्या सेवेसाठी धावत असतात. तसेच पोलिस ठाण्यांकडूनही घटनास्थळ भेटी, रात्रगस्तीसाठी ही वाहने पाठवावी लागतात. तसेच पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक अशासह विविध विभागांत २१३ मोटार कार्यरत आहेत.
पोलिस ठाण्याचे अधिकारी, डायल ११२, बीट मार्शल कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या वाहनांसाठी होणारा इंधनावरील खर्च २१ लाख रुपयांपर्यंत आहे. तर मोटार वाहन विभागाकडील वाहनांवर महिन्याकाठी १६ लाख रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्यातील व्हीआयपी दौरे, मोर्चे, बंदोबस्त यांच्या संख्यावर कमी-अधिक खर्च होतो. वर्षाला हा खर्च ४ कोटी ४४ लाखांपर्यंत जातो.
पोलिस ठाण्याकडील मदतीचे अंमलदार, बीट मार्शल यांना दुचाकी दिल्या आहेत. एखादी घटना, गुन्हा, अपघात घडल्यास संबंधित पोलिस अंमलदाराला तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागले. यासाठी या दुचाकी दिल्या आहेत. जिल्ह्यात २२२ वाहने सध्या पोलिस विभागात आहेत.
इंधनावरील खर्च कमी करण्याबाबत शासनाने व्हीआयपी दौऱ्यांतील खर्च कमी करण्याचे धोरण हाती घेतले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वाहन ताफ्यातील चार वाहने कमी करण्याचा आदेश काढला आहे. यामध्ये निदर्शन विरोधी पथक, वॉर्निंग वाहन, अग्निशमन विरोधी साहित्याचे वाहन व रिंगराऊंड (सुरक्षा यंत्रणेतील जवानांसाठीचे जादा वाहन) अशी वाहने कमी करण्याचा आदेश नुकताच पोलिस दलाला मिळाला आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.