

Kolhapur, 15 May : गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या अर्थ अधिकारी काढत आहेत. आता लग्नसराई संपलेली आहे. आता १५ तारखेपासून अधिक महिना लागल्यामुळे पुढील महिनाभर कोणतेही लग्न लागणार नाही. आली लग्न घटिका समीप तशी गोकुळची लग्न घटिका समीप आली आहे, असे विधान राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
मुश्रीफ म्हणाले, प्रशासकांनी गोकुळचा चार्ज घेतल्यापासून 50 ते 60 हजार लिटरने गोकुळचे दूध कमी झाले आहे. उष्णता हे जरी कारण असलं तरी संकलन कमी होणं, ही धोक्याची घंटा आहे. प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. गोकुळच्या प्रशासक मंडळानेही राजकारण न करता गोकुळ दूध संघाचे कामकाज चांगले करावे.
गोकुळ दूध संघाचे नाव, गोकुळच्या ब्रँडची बदनामी होईल, असं काम प्रशासकांनी करू नये. सर्व उत्पादकांनीही आपलं दूध ‘गोकुळ’कडेच घालावे. ‘गोकुळ’ला सध्या दुधाची गरज असून दुधाची चणचण भासत आहे, असेही हसन मुश्रीफ यांनी नमूद केले आहे
प्रशासक दोन-तीन महिन्यांचा पाहुणा आहे. गोकुळ इथेच राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे भूमिपूत्रच काम करणार आहेत. त्यामुळे गोकुळ कसा वाढेल, याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी जाता जाता इशारा देत आहे. आंदोलकांनी प्रशासकांना त्रास देऊ नये, असेही मुश्रीफ म्हणाले.
महाडिक-पाटील एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना, ‘त्यांनी काय करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत. युतीची सत्ता ही ‘गोकुळ’ वर येणार आहे. आमदार शिवाजी पाटील हे आता शांत आहेत.
शिवाजी पाटील हे विधानसभेचे आमदार आहेत. आमचे सहकारी आहेत त्यांच्या भावना भडकल्या होत्या. ते बोलले असतील पण ते आता कुठलंही वक्तव्य करत नाहीत. मी त्यांचा आभारी आहे. मी त्यांना बदनामीच्या दाव्याची दिलेली मुदत संपलेली आहे. त्यानंतरही मी त्यांना पुढील आठ दिवसांची मुदत वाढवून देतो, असेही मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.