Kolhapur News: हृदयद्रावक! "काय माहिती कसं काय जगतोय", आधी पोस्ट लिहिली मग पत्नी अन् दोन मुलांचा जीव गेला तिथं जाऊन त्यानं स्वतःला संपवलं

कोल्हापुरात आज राधानगरी रोडवर असणाऱ्या पुईखडी येथे बेवारस व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
crime News
crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापुरात आज राधानगरी रोडवर असणाऱ्या पुईखडी येथे बेवारस व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या व्यक्तीची ओळख पेटवण्याचे काम सुरु असताना धक्कादायक बाबा उघडकीस आली. ज्या ठिकाणी आपलं कुटुंब उद्धवस्त झालं त्याच ठिकाणी एका बापानं स्वतःच आयुष्य संपवलं. विराट गौतम असं या मृत व्यक्तीचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे. करवीर पोलिसांनी घटनस्थळी भेट दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

crime News
TCS Row: नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणानंतर आता राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये...; सरकारचा मोठा निर्णय

२२ नोव्हेंबर २०२३ रोजी कोल्हापूर शहराजवळ, राधानगरी मार्गावरील पुईखडी येथे घाटात मध्यरात्री गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला होता. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं घाटातच ही बस उलटली होती. गोव्याहून पुण्याकडं जाणारी ही खाजगी स्लीपर कोच बस होती. अचानक झालेल्या या घटनेमुळं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. यामध्ये निळू गौतम (वय ४३), रिद्धिमा गौतम (वय १७) आणि सार्थक गौतम (वय १३) या पुण्यातील कात्रज भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर या कुटुंबातील वडील विराट गौतम या अपघातातून बचावले होते.

crime News
NTAच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या अहवालांवरील धूळ अखेर साफ! NEET परीक्षेतील बदलांबाबत काय केल्या होत्या शिफारशी?

या घटनेला अडीच वर्ष उलटून गेल्यानंतर विराट गौतम या अपघातातून सावरले नव्हते. आज सकाळी पुईखडी घाटातून प्रवाशांना दुर्गंधी येत असल्यानं घाटात पाहणी केली असता सडलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळला, याची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती, सुरुवातीला ही व्यक्ती बेवारस असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, शेजारी असणाऱ्या बॅग आणि मोबाईलची तपासणी केली असता त्याची ओळख पटली.

crime News
AMC general body meeting : महासभा तहकूब होण्यामागे मोठी खदखद! सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांमध्ये 'तू तू-मैं मैं'; ठाकरेंच्या शिलेदारानं 'इनसाइड स्टोरी' आणली समोर

तीन वर्षापूर्वी झालेल्या अपघातात पत्नी आणि मुलांना गमावल्याच्या धक्क्यातून ते आजही सावरले नव्हते. त्यामुळं नैराश्यातून विराट गौतम यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि ज्या ठिकाणी तो अपघात झाला होता त्याच ठिकाणी येऊन त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यात आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं याप्रकरणी आता हळहळ व्यक्त होत आहे.

crime News
BMC News: BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा नवा कारनामा? अभिनेत्याच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा चर्चेत

विराट गौतम यांची फेसबूक पोस्ट

आज kolhapur में देह त्याग कर दिया है। पता नहीं कैसे जी रहा हूँ, कुछ लोग दुनिया में ऐसे होते हैं, जिनके बिना जीना मुश्किल लगता है. ऐसा लगता है कि ये दुनिया से गया तो हम कैसे जी पाएंगे. मेरी दुनिया खत्म उसी वक्त हो गयी मैं समझ नहीं पा रहा हूं कि फिर भला कैसे नीलू रशिका सर्विल के बिना मैं ढाई साल तक जी।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com