Satej Patil close aid Former Karveer Congress leader Rajendra Suryawanshi is set to join the NC Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Politics : सतेज पाटलांचे मनसुबे मुश्रीफांनी उधळले : जवळचा नेता बावड्याऐवजी कागलकडे वळला अन् राष्ट्रवादी प्रवेशच ठरवून आला!

Kolhapur Politics : राजेंद्र सूर्यवंशी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. पाडळी खुर्द' मतदारसंघातून लढण्याची तयारी असतानाच सूर्यवंशींचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकाच्या तोंडावर राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला नेतृत्व शोधण्याची वेळ आली होती.

अशातच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे नेतृत्व उभे करण्याची तयारी सुरु केली होती. सूर्यवंशी यांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्याचे पाटील यांचे प्रयत्न होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सूर्यवंशी यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित करून नेतृत्व तयार करण्याचा मनसुबाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी उधळला आहे.

राजेंद्र सूर्यवंशी यांनी काँग्रेसचा हात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच हातात त्यांनी ‘घड्याळ’ बांधण्याची तयारी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर येत्या आठवड्यात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सूर्यवंशी हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्तीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.

2014 च्या निवडणुकीनंतर पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सूर्यवंशी काँग्रेसमधूनच सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मात्र कधीही काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यक्रमात अधिक दिसत नव्हते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी राजेंद्र सूर्यवंशी हे कोणता निर्णय घेण्यात याकडे करवीरवासी यांचे लक्ष होते. मात्र सूर्यवंशी यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्हा परिषद गट पुनर्रचनेत त्यांचे ‘शिरोली दुमाला’ गाव ‘पाडळी खुर्द’ गटता गेले. सूर्यवंशी यांनी काँग्रेसकडून याच पाडळी खुर्द गटातून तयारी केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोबत न जाता महायुतीतील पक्षासोबत जाण्याचा सल्ला दिला. काँग्रेसकडून त्यांची तयारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर गळ टाकला. सूर्यवंशी यांचा जवळपास चार ते पाच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संपर्क आहे. पाडळी खुर्द,सडोली, परिते, गगनबावडा, कळे या परिसरात जनसंपर्क चांगला असल्याने राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT