Kolhapur ZP Election : महायुतीतीतील दोन पक्ष विरोधात भिडणार? करवीरच्या नव्या गटात 'हॉट सीट'साठी धुमश्चक्री

Mahayuti parties Karveer ZP group : महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या भाजपमधून निवडणूक लढणारे उमेदवारही आपली बाजू भक्कम करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याकडे लक्ष लागले आहे.
Kolhapur ZP Election : महायुतीतीतील दोन पक्ष विरोधात भिडणार? करवीरच्या नव्या गटात 'हॉट सीट'साठी धुमश्चक्री
Published on
Updated on

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद गट नव्याने तयार झाला आहे. हा गट खुला झाल्याने पक्षीय पातळीवर उमेदवारीसाठी सर्वच इच्छुक तयारीला लागले आहेत. इच्छुकांची भाऊगर्दी असून, प्रत्येक जण उमेदवारीसाठी शर्यतीत आहे. या गटात सध्या आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या गटांत चुरशीची लढत होणार आहे. महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या भाजपमधून निवडणूक लढणारे उमेदवारही आपली बाजू भक्कम करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसने संभाव्य उमेदवारांना पूर्ण ताकदीने मतदार संघ पिंजून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. इच्छुकांनीही मतदारांना भेटण्याचा धडाका लावला आहे. ही निवडणूक कोणाला सोपी आणि कोणाला अवघड जाणार, हे जागा वाटपानंतरच लक्षात येणार आहे. या गटात सर्वच पक्षांतील सर्वच इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरीही स्वबळावर लढवण्यास सज्ज आहेत. पाडळी खुर्द नव्याने झालेल्या या गटात प्रथमच निवडणूक होत असल्याने प्रत्येक पक्षासाठी हे 'ओपन टर्फ' आहे.

या गटातील पाडळी खुर्द, शिरोली दुमाला, वाशी, वाडीपीर, शेळकेवाडी, नंदवाळ, कोगे, महे, बीड, आरे, धनगरवाडी, सावरवाडी, सडोली खालसा आणि हिरवडे दुमाला या गावांत काही वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले आहे. यात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा काँग्रेसचा गट राष्ट्रवादीसोबत गेल्याने महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांतच तगडी फाईट होणार आहे. तर काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

करवीरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड चुरस होती. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आणि जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभा निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत हे दोन्ही नेते आपापल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सरसावले आहेत.

Kolhapur ZP Election : महायुतीतीतील दोन पक्ष विरोधात भिडणार? करवीरच्या नव्या गटात 'हॉट सीट'साठी धुमश्चक्री
Thackeray Shinde alliance : शिवसेना नेत्यांचा प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; एकत्र येण्याआधीच डाव उलटवला

याशिवाय, भाजपकडूनही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार गट पिंजून काढत आहेत. चुरशीची ईर्ष्या दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे करवीर तालुक्यात गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील काँग्रेसचा गड सांभाळतील अशी चर्चा होती. मात्र, पाटील यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांचे चिरंजीव सचिन शिवसेनेकडून निवडणूक लढवतील, अशी चिन्हे आहेत.

मात्र, त्यांनी अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. काँग्रेसने करवीर तालुक्यात यंत्रणा कामाला लावली आहे. स्थानिक शक्ती केंद्रांचा प्रभाव पाडळी खुर्द या गटात साखर कारखाना कार्यक्षेत्र, गाव पातळीवरील सहकारी संस्था आणि दूध संघांचे जाळे निर्णायक ठरणार आहे. आमदार चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे हा गट आपल्याकडे राखण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करत आहेत. भाजपकडून इच्छुक उमेदवार गावागावांतील मतदारांसोबत भेटी गाठी घेत आहेत.

Kolhapur ZP Election : महायुतीतीतील दोन पक्ष विरोधात भिडणार? करवीरच्या नव्या गटात 'हॉट सीट'साठी धुमश्चक्री
Election Form : नगरपरिषद निवडणुकीचा अर्ज भरताय? वाचा, कागदपत्रे आणि प्रक्रियेची A to Z माहिती

इच्छुक असे -

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव व शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील हे शिवसेनेकडून (शिंदे गट), राष्ट्रवादीकडून माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी (कसबा बीड), गजानन महाराज सहकार समूहाचे पृथ्वीराज सूर्यवंशी (पाडळी खुर्द), संतोष पोर्लेकर (आरे) राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून इच्छुक आहेत. भाजपकडून डॉ. के. एन. पाटील यांनी गटातील प्रत्येक गावात प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पाडळी खुर्दचे माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी शड्डू ठोकला आहे, तर काँग्रेसमधून कोण उमेदवार निवडणूक लढवणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com