तुळजापूर : महाविकास आघाडीच्या सरकारनेही मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक महिना घेतला होता, आता या सरकारनेही तसेच केलेले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, त्यामुळे नव्या सरकारने राज्यातील ज्वलंत प्रश्न सोडविणाऱ्यावर भर द्यावा. तसेच विस्ताराअभावी दिवस वाया घालवले ते त्यांनी भरून काढावेत, अशी अपेक्षा कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी नव्या सरकारकडून व्यक्त केली आहे.
स्वराज्य संघटनेच्या प्रचार व प्रसारासाठी संभाजीराजे छत्रपती आज तुळजापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्याशी सध्याच्या राजकिय घडामोडीवर पत्रकारांनी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी स्वराज्य संघटना ही सामाजिक संघटना असेल. गोरगरिबांवर अन्याय होत असेल तर ही स्वराज्य संघटना तेथे धावून जाईल.
नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी ते म्हणाले, मागच्या सरकारनेही एक महिना घेतला होता. आता या सरकारनेही तसेच केले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. दिवस वाया गेले आहेत ते त्यांनी भरून काढावेत.
नाविण्यपूर्वक स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. प्रस्थापित कसे राजकारण करतात, यापेक्षा शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे आचारविचार घेऊन कशा पध्दतीने संघटीत होऊन अन्यायाविरोधात लढा उभा करू शकतो यावर विशेष भर असेल. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तन घडविले होते.
विस्थापितांना ताकद देण्यासाठी हा कार्यक्रम होता, असे सांगून ते म्हणाले, अन्याय विरोधात लढा उभा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वराज संघटना व स्वतः संभाजीराजे तेथे पोहोचणार आहेत. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना ताकद दिली, शेतकऱ्यांना ताकद दिली. त्यांचाच आदर्श घेऊन विस्थापित सामान्य लोकांच्या अन्यायाविरेधात लढा उभारला जाणार आहे.
ईडब्लूएसची सवलत काढून घेतलेले नाही. हे सरकार सगळ्यांना आरक्षण देणार आहे. शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते, कशापद्धतीने हे मराठा आरक्षण मिळू शकते हे सांगण्यासाठी आम्ही आंदोलन केले होते. पूर्वीच्या सरकारने आरक्षण दिले होते. आता देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या सरकारमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी लक्ष घालून टिकणारे आरक्षण द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.