Deepak Kesarkar, Udhav Thackeray
Deepak Kesarkar, Udhav Thackeray sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur : आम्ही जखमेवर मलम लावतो.. आसूड ओढण्याची भाषा करत नाही... केसरकर

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते. पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत बोलत राहायचं पण, शेतकऱ्यांसाठी काहीही करायचं नाही. अशीच त्यांची भूमिका होती, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर केली.

श्री. केसरकर यांच्याशी कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री केसरकर म्हणाले, जनतेला हे आपलं सरकार वाटतंय, त्यामुळे नागरीकांची दिवाळी गोड करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. तुळशी विवाहापर्यंत आपली दिवाळी असते, त्यामुळे उशीरा का होईना आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार आहे.

केसरकर म्हणाले, आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत बोलत राहायचं पण, शेतकऱ्यांसाठी काहीही करायचं नाही. बाळासाहेब यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवतोय. बोलणं आणि करणं यात फरक आह. बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यात फरक दिसतोय.

आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल. आम्ही म्हणजे सर्वस्व हे चालत नाही, बाळासाहेब ठाकरे हे जनतेला आपले वाटायचे.

अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनाम केले जातील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल. कुणीही घाबरून जाऊ नये. हे तुमचं सरकार आहे. सरकार आता सोशल मीडियाचा वापर करून काम जनतेपर्यंत पोहोचेल. शिक्षकांची भरती घेण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. आम्ही जे निर्णय घोषित करतो, त्याची अंमलबजावणी करतो, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT