Raju Shetty, Sanjy raut  Sarkarnama
कोल्हापूर

Raju Shetty News : राजू शेट्टी म्हणाले, 'संजय राऊत स्वाभिमानीत येऊन शिवसेनेचे काम करतील का ?'

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना पाठिंबा देण्याविषयी चर्चा होणार आहे. शाहू महाराज यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला होता. एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनादेखील टोला लगावला आहे. (Raju Shetty News )

गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असे परस्पर सांगितले जातं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेऊन पाठिंबा मागितला होता, पण पाठिंबा मिळेल असं सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी मशाल हाती घ्यावी, असा प्रस्ताव आला. मशाल हातात घेणे म्हणजे संघटनेला सोडणे. पण संघटना वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून एकटाच निवडणूक लढवणार अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली.

आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. महायुतीची साथ आम्ही आधीच सोडलेली आहे. भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले.

भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले पण त्याकडे दुर्लक्ष केलं होते. शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र त्यावेळी विरोध न करता आता निवडणुकीच्यां तोंडावर बोलले जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तिपीठ महामार्ग करणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.

महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा, अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडून गेलेल्याना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही उमेदवार देऊ नका असे मी ठाकरे यांना बोललो होतो. कारण शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही. शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठिंबा द्या, असे मी म्हणालो. मात्र शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला. तो जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता. मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली. मात्र, मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो, असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असे वाटतं असेल. शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता आणि मला लोकसभा निवडून यायचं होते, असे सांगत शेट्टी यांनी मशाल हाथी का घेतली नाही या प्रश्नावर बोलताना संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचे काम करतील काय? असा खोचक टोला लगावला.

वंचितचा उमेदवार भाजपचा सदस्य

हातकणंगलेमधील वंचित उमेदवार हे भाजपचे सक्रिय आहेत. आजदेखील त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा वंचितच्या उमेदवाराने दिला नाही. ते गेल्या आठ वर्षांपासून भाजपचे सदस्य आहेत. आजदेखील आम्ही सहा जागा लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. पण आर्थिक गोष्टीमुळे कार्यकर्त्यांनी ठरवावे, असे शेट्टी यांनी सांगितले.

शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या

कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे की नाही? हे चर्चा करून ठरवणार आहे. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत, कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार दिला तरी कोल्हापूरबद्दल आम्ही विचार करू, असेही शेट्टी म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT