Kolhapur News : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आदमापूर येथे जाऊन श्री सद्गुरु बाळूमामा मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबा समवेत त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
या विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याचे दाट शक्यता होते, वातावरण अतिशय चांगलं होतं. आपल्याच सहकार्याने नुरा कुस्ती खेळली ती कुस्ती पूर्व नियोजित होती हे कळलं नाही. त्याचा मी बळी ठरलो आणि अल्पशा मतांनी पराभव झाला. या पराभवाची मी गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
बीड सरपंच देशमुख यांच्या हस्ते संदर्भात बोलताना, एका गावच्या सरपंचाची अशा पद्धतीने हत्या होणे हे दुर्दैवी आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. तपासाच्या दृष्टीने सरकारने गांभीर्याने पावलं उचलली आहेत.
काही आरोपी अटकेत आहेत पुढची ही आरोपी अटक होतील. कोणीही दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, त्यात संदर्भात राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल असं राम शिंदे म्हणाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केल्यानंतर राम शिंदे यांनी त्याला चोख प्रतिउत्तर दिला आहे. महाराष्ट्रातील थंड हवा खाण्यासाठी राहुल गांधी आले आहेत. गांभीर्यपूर्वक दखल मुख्य मंत्र्यांनी घेतली असताना महाबळेश्वरची हवा खाण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी स्वतःवर हवा खाण्यासाठी आलेले अशी टीका होऊ नये म्हणून सरकारवर आरोप केले. अशा शब्दात राम शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.