Rahul Gandhi : त्यांनी आमच्या निळ्या क्रांतीला फॅशन शो बनवला... हा नेता राहुल आणि प्रियंका गांधींवर भडकला

Akash Anand targets Congress leader : उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर निशाणा साधला
Mayawati, Akash Anand
Mayawati, Akash AnandSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत संसदेत केलेल्या वक्तव्या विरोधात आज देशभरात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात येत आहेत.  एकीकडे कॉग्रेस आक्रमक झाली असताना उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे.

बहुजन समाज पार्टी (BSP) अध्यक्ष मायावती यांचे पुतणे आणि BSP राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद म्हणाले की, कोट्यवधी शोषित, वंचित आणि गरिबांसाठी बाबासाहेब आंबेडकर हेच देव आहेत. मात्र त्यांच्या नावाचा मतांसाठी वापर करणे ही आजकाल फॅशन झाली आहे.

आधी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला,  आणि आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आमच्या निळ्या क्रांतीला फॅशन शो बनवले आहे.  तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेशी छेडछाड केली असल्याचा आरोप आकाश आनंद यांनी केला. 

Mayawati, Akash Anand
Hasan Mushrif : इचलकरंजीत महाविकास आघाडीला धक्का,' ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत

मात्र देशातील दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित लोकांच्या स्वाभिमानासाठी बसपचे मिशन सुरू राहील. तसेच गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा पश्चाताप करावा लागेल. आज दिल्लीत बसपाचंही निदर्शनं आहे. पक्ष आज दुपारी 1 वाजता लखनौमध्ये आंदोलन सुरू करेल आणि त्यानंतर राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन डीएमला सादर केले जाईल. असं आकाश आनंद यांनी सांगितले. 

Mayawati, Akash Anand
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची वर्षाअखेर गोड! डिसेंबरचा हफ्ता आजपासून खात्यात जमा होणार, पण रक्कम किती?

काय म्हणाले अमित शहा ? 

17 डिसेंबरला संसदेत अमित शहांच्या भाषणानंतर हा वाद सुरू झाला. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री शाह आंबेडकरांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्याबद्दल बोलत होते. या भाषण दरम्यान अमित शहा म्हणाले, “आता ही फॅशन झाली आहे… आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com