Sambhaji Raje  Sarkarnama
कोल्हापूर

Sambhajiraje News : संभाजीराजेंच्या खासदारकीचा मार्ग खडतर; राज्यसभेला जी अडचण झाली, तीच लोकसभेला?

Rahul Gadkar

Kolahpur News : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत संभ्रमावस्था आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून शब्द घेऊन गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील 1,255 गावे यापूर्वी पिंजून काढली, तर दुसरीकडे ही जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी फिल्डिंग लावल्याचे सांगितले जाते. लोकसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी जुनी जखम विसरलो नाही, तर आमदार सतेज पाटील यांनी सरप्राईज चेहरा, अशी दोन विधाने झाल्यानंतर हा विकास आघाडीच्या उमेदवाराबाबत आणखी उत्सुकता वाढली. त्यात संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला मेळावा हा चर्चेचा विषय ठरला. अशातच महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जे राज्यसभेला झालं तेच लोकसभेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागे झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. तिकडून भाजपकडून पाठिंबा घ्यायचा आणि दुसरीकडून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यायचा. असा विचार करून निवडणुकीची घोषणा केली होती. शिवसेनेने शिवसेनेत प्रवेश करूनच उमेदवारीवर ठाम असल्याचं सांगितल्यानंतर राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांना माघार घ्यावी लागली होती. त्यातून शिवसेनेबाबत त्यांच्या मनात कटुता निर्माण झाली.

लोकसभेलादेखील आज प्रस्ताव महाविकास आघाडीकडून असल्याचे सांगितला जात आहे. स्वराज्य संघटनेचा बंध तोडून टाकला तरच माजी खासदार संभाजीराजे यांचा कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांना याच मुद्ध्यावर माघार घ्यायला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यासाठी त्यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वराज्यचा विस्तार कोल्हापुरात नाही

लोकसभेसाठी एक म्हणजे कोल्हापूर की नाशिकअगोदर हे संभाजीराजे (Sambhjiraje) यांना निश्चित करावे लागेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ते स्वराज्यसाठी जागा सोडा, असा आग्रह धरत आहेत. परंतु स्वराज्यचा विस्तार कोल्हापुरात नाही. महाविकास आघाडीची भूमिका राजू शेट्टी (Raju shetty) यांच्याबद्दल आहे ती भूमिका संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबतीत आहे, असे नाही. पण कोल्हापुरातून तीन पक्षांचे बळ घेऊन संभाजीराजे छत्रपती हे विजयाच्या जवळ पोहोचू शकतात.

(Edited By Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT