Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे नेते आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथील काळाराम मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा केली जाणार असून संध्याकाळी गोदातीरी आरती केली जाणार आहे. मात्र या सगळ्यावर आता मनसेने टीका केली आहे. त्यांच्या या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कुठल्या नैतिकतेने काळाराम मंदिरात प्रवेश ?
आज अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अयोध्येत उपस्थित न राहता नाशिक इथल्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पूजा करून गोदातीरी आरतीदेखील करणार आहेत. मनसेचे सचिव आणि प्रवक्ते योगेश खैरे यांनी मात्र या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीचा एक घटकपक्ष आहे. इंडिया आघाडीत भाजपविरोधातील सर्व पक्ष आहेत. मात्र ज्यांनी राम मंदिर आणि प्रभू श्रीरामांच्या विरोधात अपशब्द वापरले त्यांच्यासोबत ठाकरे आहेत. ते कुठल्या नैतिकतेने काळाराम मंदिरात प्रवेश करीत असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय आहे 'ट्विट'...
कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष....
मस्जिद पाडून बांधलेल्या मंदिराला आम्ही मानत नाही, असं म्हणणारे उदयनिधी स्टॅलिन....
प्रभू श्रीराम काल्पनिक म्हणणारी काँग्रेस...
प्रभू श्रीराम आणि सीतामाईबद्दल अतिशय हीन वक्तव्य केलेल्या सुषमा अंधारे...
राजकारण आणि सत्ता यासाठी या सर्वांसोबत हातमिळवणी केलेले उद्धवजी....
आपण काळाराम मंदिरात कुठल्या नैतिक अधिकाराने प्रवेश करणार आहात ?
शिवसेना उबाठामध्ये बऱ्याच उत्तर भारतीय लोकांनी प्रवेश केला म्हणे...
सातत्याने उबाठाची तळी उचलणाऱ्या कराळेमास्तरांना...
एका मराठी माणसाला मात्र मातोश्रीच्या दारात तिष्ठत उभं करण्यात आलं !!
असं ट्विट करत योगेश खैरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावरून धुसफुस बाहेर काढली आहे.
नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिबिरे
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर आयोजिण्यात आलं आहे. या शिबिरात स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून ते नेमकं कोणत्या विषयांवर बोट ठेवतात, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.