Sambhaji Raje : उट्टे काढण्याची भाषा, संभाजीराजे कोणाचा बदला घेणार?

Satej Patil : 2009 साली संभाजीराजेंना दिलेली जखम आजही भळभळत असून विरोधकांना दिलेला इशाऱ्याचे बदल्यात रुपांतर होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
Sambhaji Raje
Sambhaji Raje Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोणता चेहरा असणार याबाबत अजून निश्चित झाले नाही. मात्र, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीकडून सरप्राईज चेहरा असेल, असे विधान करून कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

तर तोचा धागा कडून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जुन्या जखमा विसरलो नसून विरोधकांचे उट्टे काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाजीराजे नेमके कोणाला इशारा देत आहेत, यावर चर्चा रंगल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुक कोल्हापूर मधून लढण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहेत. शिवाय महाविकास आघाडीसोबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचे ही त्यांनी बोलण्यातून दाखवून दिले आहे. मात्र, सतजे पाटील आणि संभाजीराजेंच्या विधानातून संभाजीराजेच महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील का हे स्पष्ट होऊ शकले नाही.

त्यामुळे उमेदवारीबाबत अजूनही उत्सुकता आहे. पण इशाऱ्याचे बदल्यात रूपांतर होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. कारण शेवटच्या क्षणी धनंजय महाडिक यांनी सदाशिवराव मंडलिक यांचे काम केल्याचे बोलले जात आहे.

Sambhaji Raje
Kolhapur Politics : कोल्हापुरात DPDC वरून 'राजकीय कुस्ती'

संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या विधानामुळे मागील राजकारणाला उजाळा मिळाला आहे. शिवाय गेल्या पाच वर्षात घडलेल्या राजकारणामुळे संभाजीराजे यांच्यात उट्टे काढण्याची भाषा तयार झाली की काय? अशी देखील चर्चा आहे. त्याशिवाय 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा राग आजही त्यांच्या मनात असल्याचे दिसत आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काडीमोड स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.

मात्र, राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यास संभाजीराजे यशस्वी झाले. त्यामागे सतेज पाटील यांचा हात असल्याचे बोलले जात होते. तर हसन मुश्रीफ यांनी देखील प्रामाणिक प्रयत्न केले होते.पण राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी मंडलिक यांच्या मागे आपली सर्व फौज उभी केल्याचे सांगितले जाते. त्यात संभाजीराजे यांचा पराभव झाला होता. त्यामुळेच दोन दिवसापूर्वी दिलेली प्रतिक्रियेमुळे या पराभवाची सल अजूनही त्यांच्या मनात धगधगत असल्याचे जाणवते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पाच वर्षात भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळवल्यानंतर सातत्याने संभाजीराजे छत्रपती कोणालाही न दुखवता आपली भूमिका घेत राहिले. संभाजी राजे छत्रपती भाजप आल्यानंतर पक्ष वाढीसाठी मदत होईल, असा भाजपचा समज होता. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी नेहमीच आपल्या पुरोगामी विचारावर चालत वाटचाल सुरू ठेवली.

त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून अप्रत्यक्षपणे बाहेरून पाठिंबा मिळेल, अशी आशा संभाजीराजे छत्रपती यांना होती. मात्र त्या ठिकाणीही धनंजय महाडिक यांनी उमेदवारी मिळून संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट केला. याचा देखील तर्क संभाजी राजे यांच्या विधानामागे लावला जात आहे.

Sambhaji Raje
Lok Sabha Election 2024 : आतापासून अतिउत्साह दाखवू नका; ठाकरेंनी बजावले

राज्यसभेची खासदारकी स्वीकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्या बाबत उघडपणे श्रीमंत शाहू महाराज यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संभाजी राजे यांनी घेतलेली भूमिका ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात सलत गेली. त्यातून निर्माण झालेली दरी ही संभाजी राजे छत्रपती यांना भाजपपासून दूर करून गेली.

त्यातूनच त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बेदखल केल्याने संभाजीराजे यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली. राजभर दौरा करून कार्यकर्त्यांची फौज सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत भाजपच्यां नेत्यांचा पराभव करण्याचा बेत त्यांच्या मनात आहे का?

काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या विधानावरूनच महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच आहे काय? अशी शंका उपस्थित होते. त्यामुळे संभाजी राजे छत्रपती यांचे विधान किती जणांचा वचपा काढणार हे आगामी काळाची ठरवेल.

(Edited By Roshan More)

Sambhaji Raje
Shivsena News : मोठी बातमी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाचा अखेर मुहूर्त ठरला; 'या' दिवशी करणार घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com