8th Pay Commission Sarkarnama
महाराष्ट्र

8th Pay Commission: नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; आजपासून आठवा वेतन आयोग लागू, किती पगार वाढणार जाणून घ्या

8th Pay Commission Implemented Today: फिटमेंट फॅक्टरवर आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही अवलंबून असते. त्यामुळे तुमचा पगार वाढ किती होणार हे जाणून घ्या

Mangesh Mahale

8th pay commission salary increase, pay commission latest news,नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. आजपासून आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.

आज 8 वा वेतन आयोग लागू झाला असला तरी नवीन वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळण्यास उशीर होणार आहे. फिटमेंट फॅक्टरवर आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही अवलंबून असते. त्यामुळे तुमचा पगार वाढ किती होणार हे जाणून घ्या

नवीन वेतन आयोगाअंतर्गत काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे. यासाठी शिफारसी सादर करण्यास आयोगाने सांगितले आहे. त्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या नव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जर 18 हजार रुपये असेल तर तो वाढून 51 हजार 480 होऊ शकतो.

8 वेतन आयोग हा 2028 मध्येच लागू होणार असल्याची चर्चा होती. आठवा वेतनाचा अहवाल सादर करण्याची मुदतीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी वाढ देण्यात आली होती. या आयोगाच्या आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती पंकज चोधरी यांनी काही दिवसापूवी दिली होती.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2026 मधील महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपेक्षा आहे. पण, एलआयसीपीआयच्या सध्याच्या आकडेवारीनुसार या महिन्यापासून (जानेवारी) महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 2.57 फिटमेंट फॅक्टर जाहीर करण्यात आला होता. या आधारे 7 हजार रुपये असलेला किमान पगार 18 हजार रुपयांवर पोहोचला. मात्र, यावेळी 1.92, 2.15, 2.57 यापैकी एक फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित केला, तर लेव्हलनुसार 1 ते 18 पर्यंत किमान वेतन किती वाढेल हे इथे आपण जाणून घ्या.

फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित केल्यास वेतन किती वाढेल?

  • Level 1 : सध्याचे वेतन रु. 18,000 वरून रु. 34,560 पर्यंत वाढेल.

  • Level 2 : सध्याचे वेतन रु. 19,900 वरून रु. 38,208 पर्यंत वाढेल.

  • Level 3 : सध्याचे वेतन रु. 21,700 वरून रु. 41,664 पर्यंत वाढेल.

  • Level 4 : सध्याचे वेतन रु. 25,500 वरून रु. 48,960 पर्यंत वाढेल.

  • Level 5 : सध्याचे वेतन रु. 29,200 वरून रु. 56,064 पर्यंत वाढेल.

  • Level 6 : सध्याचे वेतन रु. 35,400 वरून रु. 67,968 पर्यंत वाढेल.

  • Level 7 : सध्याचे वेतन रु. 44,900 वरून रु. 86,208 पर्यंत वाढेल.

  • Level 8 : सध्याचे वेतन रु. 47,600 वरून रु. 91,392 पर्यंत वाढेल.

  • Level 9 : सध्याचे वेतन रु. 53,100 वरून रु. 1,01,952 पर्यंत वाढेल.

  • Level 10 : सध्याचे वेतन रु. 56,100 वरून रु. 1,07,712 पर्यंत वाढेल.

  • Level 11 : सध्याचे वेतन रु. 67,700 वरून रु. 1,29,984 पर्यंत वाढेल.

  • Level 12 : सध्याचे वेतन रु. 78,800 वरून रु. 1,51,296 पर्यंत वाढेल.

  • Level 13A : सध्याचे वेतन रु. 1,18,500 वरून रु. 2,27,520 पर्यंत वाढेल.

  • Level 13 : सध्याचे वेतन रु. 1,31,100 वरून रु. 2,51,712 पर्यंत वाढेल.

  • Level 14 : सध्याचे वेतन रु. 1,44,200 वरून रु. 2,76,864 पर्यंत वाढेल.

  • Level 15 : सध्याचे वेतन रु. 1,82,200 वरून रु. 3,49,824 पर्यंत वाढेल.

  • Level 16 : सध्याचे वेतन रु. 2,05,400 वरून रु. 3,94,368 पर्यंत वाढेल.

  • Level 17 : सध्याचे वेतन रु. 2,25,000 वरून रु. 4,32,000 पर्यंत वाढेल.

  • Level 18 : सध्याचे वेतन रु. 2,50,000 वरून रु. 4,80,000 पर्यंत वाढेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT