Chandrashekhar Bawankule News : जमीन खरेदी विक्री करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (ता.1) करण्यात येणार आहे.
दस्त नोंदणी करताना खोटी कागदपत्रे सादर करून तसेच खोटे साक्षीदार उभे करून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधारकार्डद्वारे मानवी हस्तक्षेप कमी करून फसवणूक टाळली जाऊ शकते. .
ज्यांच्याकडे आधारकार्ड नसेल अशा व्यक्तींनी आधार नोंदणी केल्याची पावती व त्याचसोबत अन्य सरकारी ओळखपत्र तसेच व्यवहार होत असलेल्या संबंधितांचे कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागणार आहेत. दरम्यान, खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणी यासह 63 प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी हा नियम लागू राहणार आहे.
दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासोबतच दस्त नोंदणीवेळी मूळ दस्त म्हणजे खरेदीखत, भाडेपट्टा किंवा बक्षीसपत्र नोंदवायचे आहे ते योग्य मुद्रांक शुल्कासह तयार असावे. ऑनलाईन फी भरलेल्या चलनाची मूळ पावती, पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटोव आदींची आवश्यकता असते. प्लॅट सदनिका असल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, मंजुर झालेला नकाशा, रेरा प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देखील आवश्यक असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.