Maharashtra Political Live Update : शिवतीर्थावर आज ठाकरे बधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Political Breaking Live Headlines Updates : मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासह राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

दुष्काळात अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडता येणार नाही; बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना अधिकारी मुख्यालयावर उपलब्ध असणं गरजेचं असल्याने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय रजा घेता येणार नाही, तसंच परवानगीशिवाय मुख्यालयही सोडता येणार नाही, असे आदेश काढले आहेत.

बारामतीत दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या

बारामती तालुक्यातील शेरेवाडीत मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवतीर्थावर आज ठाकरे बधूंची संयुक्त पत्रकार परिषद

आज सकाळी 11.30 वाजता शिवतीर्थ येथे ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आज महत्त्वाची बैठक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे आज दोन्ही ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण जाणार

डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदेंचा शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर कोणत्याही क्षणी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आम्ही नाकारू शकत नाही त्यानुसार आज किंवा उद्या पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याची माहिती म्हात्रेच्या वकिलाने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com