Congress leader Join BJP :काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मोठा धक्का : आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Former Congress MLA Rahul Bondre joins BJP : काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मोठा धक्का बसला असून माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. तर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसला मोठा बसला आहे. भाजपने राजकीय खेळी करत थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाच धक्का दिला असून त्यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना गळाला लावले आहे. बोंद्रे यांनी काँग्रेसची साथ सोडली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची तारीख देखील ठरली असून सपकाळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला लागलेली गळती अद्याप थांबलेली नाही. आता बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. यामुळे जिल्ह्यासह चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय खलबळ उडाली आहे.

बोंद्रे यांनी आपल्या फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी, 'मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्याशी नाळ जुळवून आहे. विशेष म्हणजे चिखली मतदारसंघातील नागरिकांसोबत. या लोकांच्या संपर्कात राहून सेवा करत आहे. तर मी असो किंवा माझ्या परिवाराने राजकारणाकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही. याकडे फक्त सेवा करण्याचे माध्यम असे पाहिलं आहे.

Harshwardhan Sapkal
Congress MLA: काँग्रेस आमदाराच्या पुतणीचा कारनामा! कामावर न जाताच दरमहा ७५,००० रुपये पगार घेत होती; 'असा' झाला भांडाफोड

पैसा मिळवण्यासाठी नाही तर इतरांना मदत करून, त्यांच्या सुख-दुख:त सहभागी होऊन आनंद मिळवायचा हा उद्देश आम्ही सातत्याने ठेवला आहे. या राजकीय प्रवासात मी सातत्याने माझ्या पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. जनतेसोबत देखील प्रामाणिक राहिलो. हीच माझी संपत्ती आहे. तुम्ही या प्रवासात मला नराध्यक्ष दोनदा विधानसभेत पाठवलतं, माझ्या बोलण्यावर सहकारातल्या अनेक निवडणुकीत मतदान केलंत. यामुळे तुमचा विश्वास हाच माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही, माझी जात, धर्म, पक्ष बघितला नाही. या सर्व भिंती तोडून मतदाराने मतदान केलंत. आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेम दिलं.

पण राजकीय आयुष्यात अनेकदा निर्णय घेणं फार अवघड असतं. अनेक आठवणी, नाती आणि संबंध असतात, अशावेळी निर्णय घेणं फार अवघड असतं असं म्हणत त्यांनी आता एक अवघड निर्णय घ्यावा लागणार असल्याचे आपल्या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

तसेच हा निर्णय आपल्या स्वार्थासाठी किंवा कोणत्या पदासाठी नाही तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सर्वांसाठी आहे. तर चिखलीच्या राजकारणाची भविष्य ठरवण्यासाठी तो निर्णय घेत आहे. काहींना याबाबत प्रश्न पडू शकतात. काहींना तो पटेल तर काहींना वेळ लागेल. पण मी इतकचं सांगेन की राहुल बोंद्रे मागी २५ वर्षात कधी बदलला नाही, पुढेही बदलणार नाही.

Harshwardhan Sapkal
Nashik Congress : राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चक्र फिरली, नाशिकमध्ये नवी कार्यकारिणी जाहीर

मार्ग बदलेत पण माणसं नाही. माझा उद्देश नाही, राजकारणाची दिशा बदलेल पण मार्ग नाही, असे म्हणत ज्या पद्धतीने आतापर्यंत साथ दिली तशीच पुढेही द्या असा साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. तसेच यावेळी बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. तर आता आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल बोंद्रे यांनी या स्पष्ट केले आहे. तर येत्या २२ सप्टेंबर रोजी राहुल बोंद्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com