Devendra Fadnavis-Aaditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : 'अदानींना मदत करण्यासाठी घनकचरा कर, हे एप्रिल फुल सरकार'; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

Aaditya Thackeray On Mahayuti : राज्यातील महायुती सरकारने आता धनकचरा उचलण्यावर कर लावला आहे. या निर्णयावरून आता राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाना साधला आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारने मुंबई पाहापालिकेसाठी घनकचरा कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याबाबत मसुदा तयार झाला असून 31 मे पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात नागरिकांकडून मागवण्यात येणार आहेत. या मसुद्यानुसार 100 रुपयांपासून पुढे शुल्क निश्चित करण्यात येणार आहे. तर कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सेवा कर म्हणून ५० चौ.मी. सदनिकेसाठी 100 रुपये वसूल करण्यात येणार आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी महायुती सरकार हे एप्रिल फुल सरकार असून फक्त अदानींना मदत करण्यासाठी घनकचरा कर लादल्याचा दावा केला आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी, आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचेही पैसे सर्वसामान्यांना मोजावे लागणार आहेत. हे सरकार एप्रिल फुल सरकार असून गेल्या 100 दिवसांत दंगली, वेगळ्यावेगळ्या घडामोडी आणि दुर्घटना शिवाय काहीच नवी चांगली एक सुद्धा पॉलिसी मिळालेली नाही. तर चांगलं काम या सरकारने केलेले नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच हे सरकार एप्रिल फुल सरकार म्हणण्याचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेतून 2100 देणार होते. पण अजून दीड हजारच दिले जातायत. आता तर ही योजनाच बंद होण्याच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद केली असून कर्जमाफी देऊ असे म्हटले होते. पण आता उपमुख्यमंत्र्यांनी हाथ वर केले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचे म्हटलं आहे. या सरकारने खड्ड्यातच मुंबई नेल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केलाय.

दरम्यान या घनकचरा प्रश्नावरून दोन-तीन महिन्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. तर सर्वसामान्य मुंबईकरांवर पहिल्यांदा अशा पद्धतीने घनकचरा लादला जातोय. हा निर्णय फक्त आदानीसाठी घेतला जात असून कंत्राटदारांना खूश करण्याठी त्यांच्या खिशात पैसै भरण्यासाठी घेतल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तर येथील डम्पिंग ग्राउंड अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असतानाही दिलं गेलं आहे. नगर विकास खातामुळे देवणारचं डम्पिंग ग्राउंड पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या माथ्यावर मारलं जातयं. उद्या हेच आदानी देवनार ग्राउंडमधून डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून देाण्याची मागणी करतील. तर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशावर अशा पद्धतीने दरोडा टाकला जातोय.

त्यासाठी 2.5 ते 3 हजार कोटींचा बोजा मुंबई महापालिकेवर म्हणजे जनतेवर पडणार आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे होती, तेव्हा असे कोणतेही छुपे कर आपण लावले नव्हते. तसेच आपण 500 चौरस फूटांच्या घरावर मालमत्ता शुल्क माफ केले होते. मात्र, आता एप्रिल फूल सरकार जनतेवर घनकचरा शुल्क लादत आहे. असे अनेक छुपे कर, अदानी कर लादले जात असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.

आता हे थांबणार नसून प्रत्येक दर तीन वर्षांनी यात सुधारणेच्या नावाखाली आणखी वाढ होणार आहे. ही परिस्थिती मुंबईकरांवर कोणी आणली, हा विचार आपण करायला हवा असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर कधी काळी मुंबई महापालिका आपल्याकडे असताना 92 हजार कोटींच्या सरप्लसमध्ये होती. पण आता हे सरकार मुंबईकरांवर कर लावत आहेत. हे सरकारने मुंबईची लूट करून जनतेचे पैसे चोरून लाडक्या कंत्राटदारांच्या खिशात टाकत असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT